आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळे झेंडे:भारतीय लष्कराचे कंत्राटीकरण थांबवण्याची भीम ब्रिगेडची मागणी

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार भारतीय लष्कराचे कंत्राटीकरण करीत असल्याचा आरोप भीम ब्रिगेडने केला आहे. अग्निपथ ही योजना त्याचेच द्योतक असून, देशभरात या योजनेला विरोध होत आहे. तरुणांच्या भविष्याचा खेळखंडोबा करणारी ही योजना रद्द करून पूर्वीप्रमाणेच सैन्य भरती राबवण्याची मागणी भीम ब्रिगेडने केली आहे. यावेळी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकीवर मोर्चा काढत, काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेचा निषेध नोंदवण्यात आला.

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला आता देशभरातून विरोध होत आहे. या योजनेंतर्गत आता तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या सैनिकांना ‘अग्निवीर’ म्हणून संबोधिले जाईल. यातील फक्त २५ टक्के तरुणांनाच सेवेत कायम केले जाईल. त्यामुळे या योजनेचा देशभरात विरोध होत आहे. ही योजना भारतीय लष्कराचे खासगीकरण करणारी असल्याचे भीम ब्रिगेडचे म्हणणे आहे. त्यामुळे या योजनेच्या निषेधार्थ इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळे झेंडे दाखवीत निषेध मोर्चा भीम ब्रिगेडने काढला. ही योजना तातडीने रद्द करून नियमित सैन्य भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विक्रम तसरे, प्रवीण मोहोड, गौतम सवई, शरद वाकोडे, उमेश कांबळे, रूपेश तायडे, नितीन काळेंसह मोठ्या संख्येने सैन्य भरतीची तयारी करणारे युवक सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...