आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभीमा कोरेगाव प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सर्व भीमसैनिकांवरील गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे राज्य शासनाने नवीन जीआर काढून सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे. अशी मागणी, ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.पँथरने निवेदनात म्हटल्या प्रमाणे, जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव येथे सुनियोजित दंगल घडवून आणण्याचे षडयंत्र काही समाजकंटकांकडून करण्यात आले होते. या मध्ये शौर्यस्तंभाला अभिवादन करण्याकरिता आलेल्या भीम अनुयायांना मारहाण केली होती.
तसेच जाळपोक आणि वाहनांची तोडफोड झाली. दंगली घडविणाऱ्यांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्यात आली. यामध्ये हजारो भीमसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याला जवळपास चार वर्षे लोटली आहे. मात्र, अजूनही गुन्हे मागे घेण्यात आले नसल्याचे पँथरचे म्हणणे आहे. शासनाने कोरोना काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांवर, तसेच मराठा समाज बांधवानी काढलेल्या मोर्चावरील गुन्हे स्वतंत्र जीआर काढून मागे घेण्यात आल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेचे म्हणणे आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर असलेले १२५ राजकीय गुन्हे जीआर काढून मागे घेतल्याचा आरोपही पँथरने यावेळी निवेदनातून केला आहे.
त्यामुळे नवीन जीआर काढून भीमसैनिकांवर लावण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने निवेदनातून केली आहे. यावेळी शीला गजभिये, रुपेश कुत्तरमारे, अविराज सावळे, वर्षा आकोडे, अतुल मसुले, यश चक्रे, सनी गोंडाणे, सुनीता रायबोले आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.