आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धास्थान:भुसावळ-वर्धा पॅसेंजर पुन्हा सुरू होणार ; जाण्या-येण्यासाठी सुविधा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ-वर्धा पॅसेंजर पुन्हा धावू लागणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅसेंजरद्वारे विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली संत नगरी शेगाव येथे मोठया संख्येत प्रवासी ये-जा करत असतात. दु, २.२० नंतर शेगाव येथून अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा (अमरावती), चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, पुलगाव आणि वर्धा येथे येण्यासाठी रेल्वेच नाही. त्यामुळे सकाळी असलेल्या गाड्यांनी भाविक शेगावला गेले की त्यांची फारच धावपळ व्हायची. कारण २.२० च्या आधी रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागायचे किंवा शेगाव येथे विश्रांती घेऊन दुसऱ्याच दिवशी यावे लागायचे.

परंतु, १५ नोव्हेंबरपासून ही पॅसेंजर सुरू होत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पॅसेंजर असल्यामुळे प्रत्येक लहान स्थानकांवर ती थांबते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी ती किफायती व सोयीस्कर असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली.पॅसेंजर गाडी क्र. १११२१ ही दु. २ वाजता भुसावळ स्थानकावरून सुटेल. तसेच रात्री ९ वाजता वर्धा स्थानकावर पोहोचेल. दु. ४.३० वाजता शेगाव स्थानकावर, सायं. ५.३० वाजता अकोला स्थानकावर, सायं. ७ वाजता बडनेरा स्थानकावर थांबा घेईल. त्याचप्रमाणे पॅसेंजर गाडी क्र. १११२२ वर्धा-भुसावळ ही १६ नोव्हेंबर राेजी रात्री १२.०५ वाजता वर्धा स्थानकावरून सुटेल आणि स. ९.१५ पर्यंत भुसावळ स्थानकावर पोहोचेल.

एक्सप्रेसमधील गर्दी कमी होणार
सध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. ते बघता पुन्हा पॅसेंजर सुरू झाल्यानंतर आपोआपच एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी कमी होणार आहे. लहान स्थानकांवरही ही पॅसेंजर थांबत असल्यामुळे प्रवाशांना तिकीटासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही.

बातम्या आणखी आहेत...