आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:विदर्भ महाविद्यालयात ‘नेट-सेट’ला  मदत करणारी बायोजीनियस स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेट, सेट या प्राध्यापकांच्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या परीक्षांना मदत व्हावी म्हणून येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (व्हीएमव्ही) येथे राज्यस्तरीय बायोजिनियस स्पर्धा पार पडली. संस्थेतील प्राणीशास्त्र विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत जवळपास ४२० विद्यार्थी सहभागी झाले होते. दुपारनंतर समारोप व बक्षीस वितरण केले गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख होत्या. तर अतिथी म्हणून विभागप्रमुख डॉ. के. जी. पाटील, डॉ. वर्षा झाडे, डॉ. संतोष पवार, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. उज्ज्वला देशमुख, डॉ. प्रतिभा रोहणकर, डॉ मिलिंद काळे, डॉ. संजय सुरवसे, डॉ. वैभव ठाकरे व तासिका तत्वावरील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. पदव्युत्तर विद्यार्थ्यांमधून प्रथम पारितोषिकाचे मानकरी दोन विद्यार्थी ठरले. त्यामध्ये अखिलेश पुराणिक, जैवतंत्रज्ञान विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शर्वरी देशमुख, प्राणिशास्त्र विभाग, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती यांचा समावेश आहे. त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर विद्यार्थी नेट, सेट, एमपीएससी, यूपीएससी या सर्व परीक्षांची तयारी करत असतात. जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये या सर्व परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, नेट सेट सारख्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, हे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांना कळावे, या उद्देशाने प्रा. रमेश चोंडेकर यांनी या स्पर्धेचे नियोजन केले. त्यांना इतर प्राध्यापकांनी मदत केली. यावेळी बोलताना संचालक डॉ. अंजली देशमुख म्हणाल्या, अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे खरच आवश्यक आहेत. यामधून विद्यार्थ्यांना नेट, सेट यूपीएससीसारख्या परीक्षांची तयारी कशी करायची याचे मार्गदर्शन मिळते. प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. वैभव ठाकरे यांनी केले. डॉ. मिलींद काळे यांनी आभार मानले.

सतत १६ वर्षांपासून होतेय आयोजन
कोरोनाचा काळ सोडला तर गेल्या १६ वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने घेतली जाते. स्पर्धकांचा उत्साह पाहून ही स्पर्धा मागील दोन वर्षापासून राज्यस्तरीय पातळीवर घेतली जाते. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या स्पर्धेसाठी येतात. या स्पर्धेची विशेष बाब म्हणजे अवघ्या पाच तासांमध्ये स्पर्धा घेऊन त्याचा निकाल सुद्धा जाहीर केल्या जातो. पदवीच्या विद्यार्थ्यांमधून प्रथम येणारा विद्यार्थी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमधून प्रथम येणारा विद्यार्थी यांना बायोजीनियस म्हणून जाहीर केले जाते.

बातम्या आणखी आहेत...