आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Birdwatchers Put Water Containers On The Trees Along Chhatri Lake To Bhankheda Road; Bird Lovers' Initiative To Provide Water To Birds | Amravati Marathi News

दिव्य मराठी विशेष:छत्री तलाव ते भानखेडा रस्त्याच्या कडेला झाडांवर पक्षीप्रेमी संघटनांनी ठेवली जलपात्रे; पक्ष्यांना पाणी मिळावे, यासाठी पक्षीप्रेमींचा पुढाकार

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीकितीही उन्हाळा असला तरी मनुष्य स्वत:साठी पाण्याची सोय करून घेतो. त्याचप्रमाणे प्राणीही मिळेल तिथे पाणी पितात. परंतु पक्ष्यांना पाणवठे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. त्यासाठी नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून पक्ष्यांनाही पाणी आणि निवाऱ्याचा आसरा देण्यासाठी जलपात्र व घरटी सावलीच्या ठिकाणी बसवण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन शहरातील पक्षिप्रेमींकडून करण्यात येत आहे. शहरात वॉर सामाजिक संघटनेसह इतरही संघटनांनी जलपात्र लावून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे.पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचत आहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे. यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. हा पारा ३७ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी,वा अन्य वनचर प्राण्यांवर हवामानातील बदलाचा परिणाम होतो. प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यात त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात.

पशुपक्ष्यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डिहायड्रेशन होते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते आजारी पडतात. विविध उन्हाळी सांसर्गिक आजार जडतात. अशा प्राण्यांवर वेळीच उपचार केले जातात. मात्र, प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवणे अवघड झालेे. डीहायड्रेशन, डोळ्यांचे विकार, श्वसन संस्थेचे आजार पशुपक्ष्यांना होतात. इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यावर पशुपक्षी तहान भागवतात. शारीरिक थंडा वाही शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांचे पाणी पातळी घटत चालली आहेत. आणि नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करताना दिसतात. काँक्रिटीकरणामुळे जंगलात झाडांची संख्या कमी झाली आहे. त्यातच नुकतीच पानगळ झालेली झाडे उघडी बोडकी दिसतात.

त्यामुळे पुरेशी सावलीही पशुपक्ष्यांना मिळत नाही. सिमेंट, डांबरी रस्त्यामुळे उन्हाचे चटके अधिकजाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातही घर व परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे, कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...