आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलक्या‎ पावसाचा अंदाज:थंडीचा कडाका; पारा‎ दोन अंशांनी घसरला‎

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात थंडीचा‎ कडाका चांगलाच वाढला आहे.‎ एकाच दिवशांत किमान तापमानात २‎ अंशाने घट झाली. मंगळवारी १६.१‎ अंश सेल्सिअस तापमान होते. तर‎ बुधवारी १४.१ तापमानाची नोंद झाली.‎ येत्या काही दिवसांत किमान तापमान‎ हे १२ अंशापर्यंत घटणार असल्याचा‎ अंदाज भारतीय हवामान खात्याच्या‎ कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर, बडनेराद्वारे‎ वर्तवण्यात आला आहे.

गुरुवार, ५‎ रोजीही सकाळी धुके तसेच अंशत:‎ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता‎ असून, तुरळक ठिकाणी हलक्या‎ पावसाचा अंदाज आहे. मात्र,‎ शुक्रवारपासून वातावरण स्वच्छ होणार‎ असल्याचा अंदाज आहे.‎ उत्तरेकडून थंड वारे जिल्ह्यात वाहत‎ येत आहेत. तसेच उत्तर प्रदेश ते‎ पश्चिम विदर्भातील हवेच्या खालच्या‎ थरात कमी दाबाची द्रोणिय स्थिती‎ आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात‎ हलका पाऊस पडू शकतो.‎

बातम्या आणखी आहेत...