आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:मोर्शीत भाजपतर्फे विरोधी पक्षनेते‎ पवार यांच्या राजीनाम्याची मागणी

मोर्शीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीच्या मोर्शी‎ तालुका शाखेच्यावतीने विधानसभेचे‎ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या‎ वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या विरोधी‎ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याची मागणी‎ करण्यात आली. येथील तहसील‎ कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात‎ आले. भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता‎ चौधरी, महामंत्री प्रशांत शेगोकर, तालुका‎ अध्यक्ष प्रवीण राऊत व शहराध्यक्ष सुनील‎ ढोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले‎ गेले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे‎ धर्मरक्षक, नव्हते अशा प्रकारचे वक्तव्य‎ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले‎ आहे.

त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध‎ करण्यात आला. एवढेच नव्हे तर‎ आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या फोटोला‎ चपलांचा हार घालून प्रतीमेची अवमानना‎ केली. आंदोलनकर्त्यांच्या मते पवार यांनी‎ हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत.‎ त्यामुळे ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते‎ म्हणून काम करण्यास योग्य नाहीत. त्यांनी‎ आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा,‎ अशी मागणीही यावेळी करण्यात आली.‎

आंदोलनात निवेदिता चौधरी व प्रशांत‎ शेगोकर या जिल्हास्तरीय नेत्यांसह‎ स्थानिक पदाधिकारी ज्योतीप्रसाद‎ मालवीय, विलास आघाडे, शरद‎ काटोलकर, प्रशांत राऊत, शरद मोहोड,‎ सुनील कडू, शंकर उईके, हर्षल चौधरी,‎ विलास वानखडे, मनोहर शेंडे, सुशील‎ धोटे, राजेश खाटगडे, युवा मोर्चाचे विजय‎ टेकाळे, निलेश शिरभाते, सागर माहोरे,‎ कैलाश कनेर, अनिल शिंगारे, रुपेश‎ खाटगडे, बाबाराव जाधव, सचिन चौधरी,‎ सचिन राजगुरे, विवेक चोपडे, शेखर‎ गावंडे, सोशल मीडिया प्रमुख रवी मोरे‎ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...