आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर एका नवा वाद निर्माण झाला आहे. पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली. यानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. शाईफेक केल्याच्या निषेधात भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. सोमवारी भाजप शहरच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ राजकमल चौकात निदर्शने केली. तसेच शाईफेक घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, प्रा. रवींद्र खांडेकर, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताडे, चेतन गावंडे, राजू कुरील, भारत चिखलकर, राजू मेटे, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, पद्मा कौंडण्य, सविता ठाकरे, वर्षा तायडे, रश्मी नावंदर, सविता भागवत, अलका सरदार, भारती गायकवाड, तृप्ती वाठ, कुसुम साहू, माया दळवी, प्रमोद राऊत, प्रकाश डोफे, राजेश किटूकले, जगदीश कांबे, डॉ. वीरेंद्र ढोबळे, तुषार वानखडे, संजय आठवले, सतीश करेसिया, अश्विन राऊत, तुषार अंभोरे, अजय सारसकर आदी उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.