आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील सरकार यंत्रणेचा गैरफायदा घेऊन भाजप सरकारने ज्या पद्धतीने लोकशाही धोक्यात आणली. त्यावरुन भाजप हा सर्वसामान्यांचा नाही, तर भांडवलदारांचा पक्ष आहे, असा अाराेप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शिव गर्जना जाहीर सभेत केला. ठाकरे गटातर्फे शिव गर्जना जाहीर सभेचे शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले हाेते.
सभेला छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीना ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने सुरवात झाली. यावेळी माजी खासदार अनंत गुढे, संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, शिवसेना प्रवक्त्या शुभांगी पाटील, अनिस गाढवे, माजी आमदार रामकृष्ण मडावी, धाने पाटील, जिल्हाप्रमुख मनोज कडू, महानगर प्रमुख पराग गुडधे, महिला आघाडीच्या ज्याेती अवघड, शोभा लोखंडे, बाळासाहेब भागवत, प्रकाश मारोटकर, बाळासाहेब राणे, स्वराज ठाकरे, डॉ. प्रमोद कठाळे आदी उपस्थित होते. पुढे बाेलताना खासदार निंबाळकर म्हणाले की, लोकशाही संपवण्याचा रचलेला घाट एकजुटीने हाणून पाडायचा आहे.
जनतेची दिशाभूल करून सत्तेचा सर्वसामान्य गैरफायदा घेऊन लोकशाही पायाखाली तुडवल्या जात आहेत. याचा बदला लोकशाही मार्गाने आगामी निवडणुकीत जनता घेईल, असेही ते म्हणाले. सभेचे सूत्रसंचालन ओंकार ठाकरे यांनी केले. तर प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रमोद कोहळे यांनी केले. सभेच्या यशस्वितेसाठी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख राजेश पांडे, निलेश मुंदाने, संजय चौधरी, विलास पाटील, प्रमोद ठाकरे, भूषण दुधे, निलेश इखार, सुनील गुरमुळे, छाया भारती, रेवती परसंनकर, दिलीप देवतळे, भानुदास उगले, मनदेव चव्हाण, प्रवीण चौधरी, मधुकर कोठाळे, श्रीकृष्ण सोळंके, रवी ठाकूर सूरज सोळंके शुभम रावेकर, गोकुळ राठोड, अनिल बुदले, अक्षय राणे, पवन खेडकर, योगेश ढोरे, चेतन डकरे, भावेश भांबुरकर, निलेश निंबरते, प्रशांत काळे, सुरज लोमटे, पवन शिरभाते, भुमेश्वर गोरे, लिलाधर चौधरी, गजानन झिमटे आदींनी परिश्रम घेतले.
मुस्लिम समाजातील युवकांचा पक्षप्रवेश
नांदगाव शहरातील मुस्लिम समाजातील इकरामोद्दीन अब्दुल, तोहीद शेख, अकील शेख, गोलू यांच्यासह पहुर व सालोड या गावांतील ४० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.