आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिका‎:भाजपची नीती जवळ‎ करून संपवण्याची आहे‎

परतवाडा‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रात नरेंद्र मोदींनी सुब्रमण्यम,‎ लालकृष्ण अडवाणी यांना बाजुला करत‎ राजकारणातून संपवले. नरेंद्रजींचा‎ वारसा राज्यात देवेंद्रजी पाळत असून,‎ भाजपची नीती जवळ करून‎ संपवण्याची आहे. केवळ सत्तेसाठी हा‎ त्यांचा डाव सुरू आहे, अशी प्रखर‎ टिका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब‎ ठाकरे) सुषमा अंधारे यांनी शिवगर्जना‎ अभियानांतर्गत अचलपूर येथे चौधरी‎ मैदानावर शुक्रवारी केली.‎ भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी एकेक‎ माणूस जवळ करत संपवले.‎ त्याचप्रमाणे बच्चुभाऊ कडू यांनांही नाही‎ संपवण्याचा घाट रचला. बच्चुभाऊंच्या‎ समर्थकांनी हे समजून घ्यावे.

या‎ संपवण्याच्या राजकारणात राज्याचे प्रश्न‎ तसेच पडून असून, महाराष्ट्राचे वाटोळे‎ होत आहे. ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’‎ असे म्हणत फडणवीस महाराष्ट्राचं‎ राजकारण गढूळ करीत असल्याचेही‎ त्या या प्रसंगी म्हणाल्या. शिंदे गट उद्धव‎ ठाकरे यांच्यावर कितीही आरोप करत‎ असला तरी आगामी निवडणुकीत त्यांना‎ मतदार त्यानांच साथ देणार आहेत. या‎ वेळी विचार मंचावर आमदार अशोक‎ मडावी, माजी खासदार अनंत गुढे,‎ माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील,‎ प्रिती बंड, सुधिर सुर्यवंशी, वर्षा भुयार,‎ मनीष टेंभरे, सुनीता फिस्के, नरेंद्र‎ फिस्के, नरेंद्र पडोळे, बंडु घोम , सागर‎ वाटाणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...