आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण दुर्घटना:ब्लॅक संडे... 20 किलोमीटरच्या अंतरात 7 तासात 3 अपघात; 7 जणांचा मृत्यू

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्न जुळवण्यासाठी जाणाऱ्यांपैकी पाच जणांवर काळाची झडप

रहाटगाव रिंग रोडवर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास लग्न जुळवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबीयांच्या तवेराला (कार) ट्रकने जोरदार धडक दिलेल्या जोरदार धडकेत पाच जण ठार झाले. या अपघातापूर्वी येथून २० किलोमीटर अंतरावर नागपूर महामार्गावरील सावर्डी गावाजवळ दूध घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिसरा अपघात रविवारी (दि. २७) दुपारी बाराच्या सुमारास रहाटगाव रिंग रोडवरच कार उलटल्यामुळे झाला. मात्र, त्या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, त्यापूर्वीच्या दोन्ही अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजचा दिवस अमरावती साठी प्रचंड दुख:दायक असा ‘ब्लॅक संडे’ ठरला आहे.

अंजनगाव बारी येथील अनिकेश सुरेशराव पोकळे या युवकासाठी शिरजगाव कसबा येथे मुलगी पाहण्याचा तसेच लग्न पक्के करण्याचा कार्यक्रम रविवारी होता. त्यासाठीच अनिकेतसह त्याचे आई-वडील व इतर नातेवाइक आज सकाळी अंजनगाव बारी येथून सकाळी दहा वाजता दोन वाहनाने शिरजगावला जाण्यासाठी गावातून निघाले. यावेळी अनिकेत, त्याची आई व अन्य काही नातेवाइक एका वाहनात होते तसेच दुसरे वाहन गावातील रोशन आखरे याचे होते. रोशनच्या तवेरा यावेळी धडक इतकी जबर होती कि, धडक बसताच तवेरा १८० अंशाच्या कोनात फिरली. रहाटगावकडून राजपूत धाब्याकडे जाणाऱ्या तवेराचे तोंड अपघातानंतर थेट रहाटगावच्या दिशेने झाले होते.

तसेच तवेराची समोरील बाजू चक्काचूर झाली तर वर असलेला धातूचा टफ अर्ध्यापर्यंत अक्षरश: फाटत गेला. तवेराचे अनेक सुटे भाग परिसरात उडाले होते, नागरिकांनी ते गोळा करुन ठेवले तर धडकेनंतर ट्रक अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेला जाऊन पथदिव्यांच्या खांबाला धडक दिली. यावेळी खांब जमिनीतून उखडून बाहेर आला. यावेळी तवेरामधील मृतदेह व जखमी अक्षरश: वाहनात फसले होते. दोन्ही वाहनांची गती सुसाट असून, ट्रक ओव्हरटेक करण्याच्या नादात असताना हा अपघात झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती.

सहा महिन्यांपूर्वीच घेतली होती रोशनने तवेरा
रोशन हा अतिशय महेनती युवक होता. वाहन घेण्यापूर्वी तो दुसऱ्याचे वाहन चालवायचा तर कधी इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच त्याने स्वत:चे वाहन घेतले होते. आज त्याच वाहनाचा अपघात झाला व त्यामध्ये रोशनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तवेराच्या अपघतानंतर रिंगरोडवर वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रकने पोलला धडक दिल्यामुळे झालेली ट्रक व पोलची अवस्था तसेच अपघातानंतर परिसरात उडालेले तवेराचे सुटेभाग.

कारच्या वाहनात अनिकेतचे वडील, काका, काकू, चुलत बहीण, भाचा, भाची, आत्या, मामाजी व इतर असे नातेवाइक होते. दरम्यान, अनिकेत बसून असलेले वाहन तवेराच्या समोर होते व मागे रोशनचे वाहन होते. रोशनचे वाहन रहाटगाव रिंगरोडवरील हॉटेल कंदील जवळ असतानाच विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रक सोबत तवेराची जोरदार धडक झाली. हा अपघात झाला तर अनिकेत ज्या वाहनात होता, त्यांना अपघाताची कल्पनाच नाही. त्यांचे वाहन शिराळ्यापर्यंत गेले, त्यावेळी त्यांना तवेराचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. या अपघातात तवेरा चालक रोशन रमेशराव आखरे (२६), प्रतिभा सुभाषराव पोकळे (५०), विजय भाऊरावजी पोकळे (५५, तिघेही रा. अंजनगाव बारी), क्रिष्णा सचिन गाडगे (८, रा. शिरजगाव कसबा) आणि गजानन संतोषराव दारोकर (४५, रा. जरुड) यांचा मृत्यू झाला तर ललिता विजयराव पोकळे (५०), सुभाष भाऊरावजी पोकळे (६०), सुरेश भाऊरावजी पोकळे (५८, सर्व रा. अंजनगाव बारी), संगीता गजानन दारोकर (३५, रा. जरुड), रश्मी सचिन गाडगे (३२) आणि पिहू सचिन गाडगे (६ महिने, दोघीही रा. शिरजगाव कसबा) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. ही माहिती मिळताच मृत व जखमींच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. ही परिस्थिती पाहून नातेवाइकांनी आक्रोश केला. हे चित्र पाहून उपस्थितही गहिवरले होते.

४ दिवसांपूर्वीच क्रिष्णा आला होता आजोबांकडे
या अपघातात क्रिष्णा सचिन गाडगे या आठ वर्षीय चिमुकल्याचाही मृत्यू झाला आहे. क्रिष्णा, त्याची आई रश्मी व सहा महिन्यांची बहीण पिहू हे तिघे एका लग्नासाठी अंजनगाव बारी येथे चार ते पाच दिवसांपूर्वीच आले होते. रश्मी अनिकेतच्या काकाची मुलगी आहे. आज सर्व मंडळी शिरजगावलाच जाणार असल्यामुळे त्याच वाहनात रश्मी, पिहू च क्रिष्णासुध्दा गावी जात होते मात्र, रिंग रोडवर पोहोचताच अपघात झाला असून, या अपघातात क्रिष्णाचा मृत्यू झाला तर पिहू व रश्मी या जखमी झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...