आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीदांना अभिवादन:‘युवा स्वाभिमान’चे रक्तदान शिबिर ; नागरिकांचा उत्स्फू प्रतिसाद

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षानंतर यंदा प्रथमच युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाला समर्पित असून, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना स्मृती जतन करण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

युवा स्वाभिमानद्वारा आयोजित भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. तत्पूर्वी, सकाळी सिद्धार्थ मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा उपस्थित होते. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढी, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी, बालाजी ब्लड बँक आणि अचलपूर येथील रक्तपेढीच्या चमूंनी सहकार्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळघाटातील गरजू रुग्णांचे सेवेसाठी युवा स्वाभिमान रक्तदान समितीद्वारे संकलित रक्तपिशव्या वितरीत करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...