आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:हेडगेवार रुग्णालयाच्या दशकपूर्तीनिमित्त‎ आयोजित शिबिरात 62 जणांचे रक्तदान‎; रुग्णांच्या वेदना दूर करण्याचे कार्य मोलाचे

प्रतिनिधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ येथील धर्मार्थ दवाखाना म्हणून‎ ओळख असलेल्या हेडगेवार‎ हॉस्पिटलच्या दशकपूर्ती‎ वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे‎ आयोजन करण्यात आले होते. या‎ शिबिरात ६२ जणांनी रक्तदान‎ करुन राष्ट्रीय कार्याला हातभार‎ लावला. दरम्यान, रुग्णांच्या वेदना‎ दूर करण्याचे हे कार्य अत्यंत‎ मोलाचे असल्याचे प्रतिपादन‎ शिबिराच्या उदघाटक तथा‎ कौशल्य विकास, रोजगार व‎ स्वयंरोजगार विभागाच्या सहायक‎ आयुक्त प्रांजली बारसकर यांनी‎ केले आहे.‎ प्रारंभी त्यांच्या हस्तेच या शिबिराचे‎ उद्घाटन करण्यात आले. डॉ.‎ हेडगेवार हॉस्पिटल-भाराणी‎ आयसीयूमध्ये आयोजित या‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ जनकल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष‎ अजय श्रॉफ होते. तर अतिथी‎ म्हणून बडनेरा येथील संत‎ गाडगेबाबा रक्तपेढीचे रक्त‎ संकलन अधिकारी डॉ. अनिल‎ कविमंडन, संस्थेचे सचिव गोविंद ‎ ‎ जोग, डॉ. मानसी कविमंडन,‎ वनिता कवि मंडन उपस्थित होत्या.‎

२०२२ हे वर्ष म्हणजे डॉ. हेडगेवार ‎हॉस्पिटलचे दशकपूर्ती वर्ष आहे.‎ शिवाय देशाला सुद्धा स्वातंत्र्य‎ मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ‎ ‎ दोहोंचे औचित्य साधून‎ जनकल्याण सेवा संस्थेच्यावतीने ‎सामाजिक बांधिलकी म्हणून हे ‎रक्तदान शिबिर आयोजित‎ करण्यात आले होते. शिबिरात ‎जनकल्याण सेवा संस्थेचे‎ विश्वस्त, डॉक्टर्स तसेच सर्व‎ वैद्यकीय प्रकल्पातील अधिकारी, ‎सहकारी व हितचिंतक, कर्मचारी ‎ ‎ आणि सिपना इंजिनिअरिंग ‎महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी‎ सक्रिय सहभाग घेत रक्तदान केले.‎ यामध्ये संस्थेच सचिव गोविंद‎ जोग, प्रकल्प संचालक डॉ.‎ यशोधन बोधनकर, डॉ. कीर्ती‎ सोनी, डॉ. सुमीत पात्रीकर, डॉ.‎ अक्षय चांदुरकर, डॉ. तुषार राठी,‎ डॉ. नवीन सोनी, डॉ. रोशन राऊत,‎ डॉ. स्वप्निल देशमुख, डॉ. प्रणित‎ काकडे, डॉ. श्रद्धा टोन्पे,‎ प्रशासकीय अधिकारी केदार‎ गोगरकर, अमोल भारती, प्रताप‎ ब्राम्हणवाडे, अभिषेक राठोड‎ यांचाही समावेश आहे.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल‎ भारती यांनी केले. प्रताप‎ ब्राम्हणवाडे यांनी आभार मानले.‎ संस्थेचे पदाधिकारी डॉ. राहुल‎ हरकुट, सतीश बक्षी, अविनाश‎ भोजापुरे, विशाल कुळकर्णी,‎ रक्तपेढीचे संचालक सोपान‎ गोडबोले, योगेश बारस्कर, अन्न‎ व औषध प्रशासन विभागाचे‎ संजय गांधी, डॉ. श्याम गिरी,‎ मुख्य प्रशासकीय अधिकारी मंगेश‎ कुळकर्णी, गौरव काकडे, श्रीरंग‎ कविमंडन, गुल्लू गुप्ता, सिपना‎ महाविद्यालयाचे डॉ. योगेश‎ गुल्हाने, महेश जोशी,‎ हॉस्पिटलच्या स्नेहा मुने, मयुरी‎ पुणतांबेकर, शुभा इंगोलीकर,‎ प्रतिक जोशी, आशिष जैन, डॉ.‎ शिल्पा गारोडे, डॉ. अंकिता‎ मटाले, निखिल फुलाडी, अनिता‎ कुळकर्णी, रक्तपेढीचे संजय‎ जोशी, विकास खंडार, मोहित‎ खासबागे, कार्तिक गद्रे, राजश्री‎ पाटील आदींनी शिबिराला भेट देत‎ उपस्थिती दर्शविली.‎ संस्थाध्यक्ष श्रॉफ यांनी यावेळी‎ संस्थेच्या इतर प्रकल्पांचीही‎ माहिती दिली. ते म्हणाले,‎ जनकल्याण सेवा संस्थेचे एकुण ७‎ प्रकल्प आहेत. डॉ. हेडगेवार‎ हॉस्पिटल व आयसीयु हे त्यापैकी‎ सर्वांत महत्वाचे वैद्यकीय प्रकल्प‎ आहेत. रुग्णसेवा सदन, शहरी‎ वस्तीत संत गाडगेबाबा आरोग्य‎ सेवा प्रकल्प, ग्रामीण भागात‎ मोबाइल डिस्पेन्सरी, टीमटाला येथे‎ संवेदना आरोग्य सेवा प्रकल्प‎ तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी‎ जाऊन उपचार व तपासणी‎ करणारी अक्षयवट योजना याचा‎ त्यामध्ये समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...