आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदाब अन् मधुमेह:ग्रामीण भागातील महिलांमध्ये  वाढतोय रक्तदाब अन् मधुमेह

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला अधिक श्रम करतात. असे असले तरीही ग्रामीण भागातील महिलांमध्येही आता मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार वाढत आहेत. हे ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी मधूनही हे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८९ हजार महिलांच्या तपासणी झाली असून, त्यापैकी २४ हजार ६०० महिलांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बदललेली जीवनशैली, मानसिक तणाव या कारणांमुळेच मधुमेहाची समस्या निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

जिल्ह्यात (शहर वगळून) आतापर्यंत ४ लाख ८९ हजार महिलांच्या तपासण्या झाल्या आहेत. यापैकी ५ टक्के महिलांमध्ये मधुमेहाची समस्या आहे. याचवेळी ११ हजार १४१ महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे. नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत महिलांच्या तपासण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत तपासणी मोहीम सुरु राहणार असून, गरजेनुसार, आणखी मुदत वाढवण्यात येणार आहे. या तपासण्यांमध्ये

तीन वेळा होते रक्तदाबाची तपासणी
या माेहीमदरम्यान महिलांची तपासणी करताना तीन वेळा रक्तदाबाची तपासणी केली जाते, तिन्ही वेळी उच्च रक्तदाब आढळून आल्यास संबंधित महिलेला रक्तदाबाचा त्रास असल्याचे प्रथमदर्शनी मानले जाते. तसेच मधुमेहाची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मधुमेह असल्याचे ठरवले जाते व उपचाराचा सल्ला दिला जातो.सुभाष ढोले,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी,अमरावती.

ताणतणाव वाढला; सात्विक आहार घटला
मानसिक तणाव, बदललेली जीवनशैली, तसेच व्यसन, मिठाचे व साखरेचे जास्त प्रमाणात सेवन करणे, व्यायाम न करणे, सात्विक आहाराची कमतरता या कारणांमुळे मधुमेहाची समस्या निर्माण होत आहे. याचवेळी मधूमेह नियंत्रणासाठी वजन नियंत्रित ठेवावे, स्थूल असल्यास वजन कमी करण्यावर भर द्या, साखर व मिठाचे अतिरिक्त सेवन टाळा, दररोज प्राणायाम, योगा आणि किमान ३० मिनीटे पायी फिरा, ताण न घेता जीवन जगा, दररोज सात्विक आहार घ्या. श्यामसुंदर निकम, निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...