आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • A Big Blow To Nuta, The Applications Of Two Veterans Were Rejected In The Senate. Waghmare, Priti Kadu Out Of Bitter Ground, Ready To Go To High Court

‘नुटा’ला मोठा धक्का:सिनेटमध्ये 2 दिग्गजांचे अर्ज नाकारले, डॉ. वाघमारे, प्रिती कडू मैदानातून बाद, उच्च न्यायालयात जाण्याची तयारी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींमध्ये वर्चस्व राखणाऱ्या नागपुर युनिव्हर्सिटी टिचर्स युनियनला (नुटा) सध्याच्या सिनेट व विद्वत परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या युनियनच्या दोन दिग्गज उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले असून संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

डॉ. बी. आर. वाघमारे आणि प्रिती कडू हे ते दोन उमेदवार आहेत. डॉ. वाघमारे यांनी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाचे प्रतिनिधी या सहा सदस्यीय मतदारसंघातून सिनेटसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर प्रिती कडू ह्या पदवीधरांच्या दहा सदस्यीय मतदारसंघातून सिनेटच्या उमेदवार होत्या. सदर दोन्ही अर्जांबाबत विरोधकांनी घेतलेले आक्षेप प्राथमिकदृष्ट्या नाकारण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठाने २८ ऑक्टोबरला घोषित केलेल्या विधीग्राह्य उमेदवारांच्या यादीत या दोन्ही उमेदवारांची नावेही प्रकाशित केली. परंतु नंतरच्या काळात आक्षेपकर्त्यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पुन्हा दाद मागितली. त्याठिकाणी त्यांचे आक्षेप मान्य करण्यात आले. त्यामुळे माघारीच्या शेवटच्या दिवशी (४ नोव्हेंबर) घोषित करण्यात आलेल्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या अंतीम यादीत त्यांची नावे नाहीत.

या घटनेमुळे ‘नुटा’ला जबर धक्का बसला आहे. डॉ. वाघमारे हे ऑगस्टमध्ये कार्यकाळ संपलेल्या सिनेटमध्ये पदवीधरांचे प्रतिनिधित्व करीत होते. तर प्रिती कडू यांचे यजमान प्रा. दिलीप कडू हेही याच मतदारसंघातून सिनेटमध्ये पोहोचले होते. अशाप्रकारे दोन ‘सिटींग सिटस्’ गमावल्याचे शल्य सध्या ‘नुटा’च्या जिव्हारी लागले असून उमेदवारी नाकारण्याचा मुद्दा त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठासमोर नेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सदर प्रतिनिधीनीने या संदर्भात ‘नुटा’चे पदाधिकारी तसेच दोन्ही उमेदवारांसोबत बोलणी केली. त्यांनी विद्यापीठाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु असल्याचे ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

बुधवारपर्यंत न्यायालयाला सुटी

सूत्रांच्या माहितीनुसार उच्च न्यायालयाला बुधवारपर्यंत सुटी आहे. त्यामुळे या काळात याचिका दाखल केली जाऊ शकत नाही. सदर दोन्ही उमेदवारांसाठी ही संधी असून दरम्यानच्या काळात त्यांना सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव व पडताळणी करता येईल. तशी तयारी संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे.

का नाकारले अर्ज ?

डॉ. बी. आर. वाघमारे यांनी श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून नामांकन दाखल केले होते. परंतु ते त्या संस्थेचे सदस्य असले तरी ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला. तर प्रिती कडू यांच्याबद्दल विवाहापूर्वीच्या व विवाहानंतरच्या नावावरुन आक्षेप घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...