आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:बोदूवासीयांना रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा; मातोश्री पाणंद योजनेतून मंजूर झालेला रस्ता अद्यापही तयार नाही; रस्त्याअभावी दुर्गम भागातील आदिवासींचे हाल

धारणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासन कोट्यवधी रुपये मेळघाटातील आदिवासींच्या उत्थानासाठी खर्च करीत असताना मात्र अद्यापही दुर्गम भागातील आदिवासी बांधव शासनाच्या योजनांपासून कोसो दूर आहेत. अशीच अवस्था चिखलदरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या बोदू गावातील आदिवासी नागरिकांची आहे. वीज, पाणी, रस्ते या मुलभूत सुविधा अद्यापही बोदू गावात पोहोचलेल्या नाहीत. मातोश्री पाणंद योजनेतून मंजूर झालेला रस्ता अद्यापही तयार झाला नसल्याने नागरिकांना रस्त्याअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मेळघाटातील अतिदुर्गम भागातील अनेक गावे बारमाही संपर्कहिन झालेली असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर दळणवळणाअभावी बोदू गावातील आदिवासी कुटुंबे आजही उंच पहाडातून ओबडधोबड रस्त्याने बैलगाडीने जीवघेणा प्रवास करत असल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. चौफेर अतिसंरक्षित जंगलात असलेले गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे दिडशे किमी. अंतरावर आहे. येथून मध्य प्रदेशातील भैसदई हे गाव ५ किमी. असून त्या भागातील सुमारे ३० खेड्यातील आदिवासी बांधवांचे नियमित व्यवहार भैसहेही येथे चालतात. त्यामुळे हतरू, रायपूर परिसरातील नागरिकांना बोदू येथूनच पुढे जावे लागते. मात्र रस्त्याअभावी त्यांना अनेक हालाअपेष्ठा सहन कराव्या लागतात. सर्वच दृष्टीने हे गाव संपर्कहिन ठरत आहे.

गावाच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
^वीज, पाणी, रस्ते या मुलभूत सुविधा बोदू गावात पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाचा बोदु गावाच्या विकासाकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना कसेबसे जीवन जगावे लागत आहे. रस्त्याचीही सुविधा नसल्याने अनंत अडचणी येतात.- रामभाऊ बेठेकर, संरपच, बोदू

बातम्या आणखी आहेत...