आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:अरुणावती नदीपात्रात सापडला‎ बेपत्ता माजी सैनिकाचा मृतदेह‎

मानोरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस स्टेशनला कोंडोली येथील माजी‎ सैनिक रतन विठ्ठल खडसे हे चार ऑगस्ट रोजी रात्री‎ पासून बेपत्ता असल्याची तक्रार काल पाच ऑगस्टला‎ त्यांच्या भावाने दाखल केली होती. रतन खडसे यांचा‎ मृतदेह कारखेडा येथील शंकरगिरी महाराज देवस्थान‎ शेजारी अरूणावती नदीपात्रामध्ये आढळून आला.‎

मयत रतन खडसे हे सध्या मंगरूळनाथ येथे‎ राहायला असून वडिलोपार्जित शेती पाहण्यासाठी‎ मुळगावी कोंडोली येथे आपल्या घरी मागील काही‎ दिवसांपासून वास्तव्याला होते. शुक्रवार ४ ऑगस्ट‎ रोजी कोंडोली येथील आठवडी बाजारासाठी नदी‎ पल्याड पितांबर महाराज परिसरात माजी सैनिक खडसे‎ गेले असता जोरदार पाऊस झाल्याने अरुणावती नदीला‎ मोठे पूर आले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर मयात‎ रतन खडसे घरी न आल्याने त्यांचे भाऊ भीमराव‎ विठ्ठल खडसे यांनी मानोरा पोलिस स्टेशनला दाखल‎ केली होती. माजी सैनिक रतन विठ्ठल खडसे यांचा‎ अरुणावती नदी पुरामध्ये वाहून आलेला मृतदेह‎ कारखेडा येथील शंकरगिरी महाराज देवस्थान शेजारी‎ असलेल्या नदीपात्रा जवळ प्रगतीपथावर असलेल्या‎ जलसंधारण विभागाच्या कामाजवळ आढळून‎ आल्याची माहिती मिळाली. माजी सैनिकाचे मृतदेह‎ प्रशासनाने ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीसाठी‎ पुढे पाठवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...