आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन झोनचे सहा. आयुक्त बदलले:चंद्रभागा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेंतर्गत तीन झोनच्या सहायक आयुक्त बदलले असून, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांच्याकडे झोन क्र. १ च्या सहायक आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मनपा वर्तुळात पुसतकर यांना सहायक आयुक्तपद मिळणार अशी चर्चा होती. आता मात्र त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी आली आहे.

मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशाने झोन क्र. १ चे सहायक आयुक्त योगेश पिठे यांच्याकडे सांख्यिकी अधिकारी या मूळ जबाबदारीसह झोन क्र. ३ ची सहायक आयुक्त म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. त्याचप्रमाणे झोन क्र.३ चे सहायक आयुक्त व सहायक अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्याकडे त्यांच्या मुळ पदासह झोन क्र. २ च्या सहायक आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांच्याकडे मनपाच्या सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. वानखडे यांनी याआधीही स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांसाठी उत्तम काम केले आहे. प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, या दृष्टीने या अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त कार्यभारात बदल करण्यात आला असून, या अधिकाऱ्यांनी आदेश मिळताच मूळ पदाचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळावा, असे आदेशही मनपा आयुक्तांद्वारे देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...