आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या राज्यासाठी स्वप्नवत असलेला नागपूर ते मुंबई या सहापदरी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी (दि. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. ५२० किलोमीटरचा हा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी आहे. या मार्गामुळे दळणवळणाचा वेग तर वाढणारच आहे शिवाय या मार्गावर समृद्धी कृषी केंद्र (नगर) उभारली जाणार आहेत. ही केंद्र शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने समृद्धी देणारी ठरु शकते. यातील दोन केंद्र जिल्ह्याच्या हद्दीत तयार होत आहे. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना भाजीपाला किंवा इतरही कृषी माल अवघ्या चार ते आठ तासात मुंबईतील वाशी, ठाणे, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांच्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे.
समृद्धी महामार्ग जिल्ह्यांतूनही गेला असून, धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ हे सुमारे ७३ किलोमीटरचे अंतर समृद्धीचे आहे. अमरावती जिल्हावासीयांना समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा असल्यास धामणगाव रेल्वे तालुक्यातील आसेगाव या ठिकाणी तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी या ठिकाणी प्रवेश व बहीर्गमन करण्यासाठी सोय आहे. तसेच अमरावती वरुन औरंगाबाद, शिर्डी जायचे झाल्यास कारंजा लाड येथूनही प्रवेश करता येणार आहे तसेच शिर्डीहून परतताना कारंजा वरुन बाहेर येता येणार आहे. त्यामुळे अमरावती जिल्हावासीयांना तीन ठिकाणांचा वापर समृद्धीवर जाण्यासाठी तसेच बाहेर येण्यासाठी करता येणार आहे.
अमरावतीवरुन सध्या औरंगाबाद जाण्यासाठी सात ते आठ तसेच शिर्डी जाण्यासाठी नऊ ते दहा तासांचा प्रवास करावा लगातो. मात्र, समृद्धीचा वापर केल्यानंतर अमरावतीकरांना औरंगाबाद पाच तासात तर शिर्डी सहा तासात पोहोचता येणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने समृद्धी महामार्गावर एकूण १८ कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी दोन केंद्र जिल्ह्यात होणार आहे. या केंद्रावर भाजीपाला साठवण्यापासून ते विक्रीपर्यंची सोय भविष्यात होणार आहे. तसेच मुंबई, औरंगाबाद, ठाणे अशा मोठ्या शहरातील बाजारपेठेतसुद्धा माल विक्रीसाठी नेता यावे, ती सोय राहणार आहे. त्यामुळे अमरावती वरुन अवघ्या आठ ते नऊ तासात शेतकरी मुंबईतील वाशी, ठाणे या शहरातील बाजारात पोहोचू शकणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचा एक सशक्त पर्याय उभा होणार आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्धी देणारा हा महामार्ग ठरणार आहे.
‘समृद्धी’वर असा आकारला जाणार टोल वाहनांचा प्रकार प्रति किमी कर जीप, कार, हलकी मोटर वाहने १.७३ रुपये हलकी मालवाहू, मिनी बस २.७९ रुपये बस किंवा ट्रक (२ अॅक्सल) ५.८५ रुपये तीन अॅक्सल व्यावसायिक वाहने ६.३८ रुपये अवजड बांधकाम यंत्रसामग्री ९.१८ रुपये अति अवजड वाहने ११.१७ रुपये
शेतमालाला मिळणार बाजारपेठ
जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील आसेगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी येथे कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी भरपूर सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.-डॉ. विवेक घोडके,निवासी उपजिल्हाधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.