आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेयसीने पळून जाऊन लग्न करण्याचा हेका धरल्याने प्रियकराने आगदी तिच्यासमोरच गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना राजा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ एप्रिलला उघडकीस आली. याप्रकरणी मृत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मृताच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जयेश दादलानी असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी शाम कुमार नानकलाल दादलानी (५१) यांच्या तक्रारीवरून एका युवतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, जयेश दादलानीचे दोन वर्षांपासून एक तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करायचे ठरवले होते. त्यासाठी जयेशचे नातेवाइक तयार होते. परंतु आपण पळून जाऊन लग्न करू, असा तगादा प्रेयसीने जयेशकडे लावला होता. त्यासाठी ती दबाव आणत होती. दरम्यान, तुझ्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो, असा दम ती जयशला भरत होती.आपण पळून जाऊन लग्न केले नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन, अशी धमकी प्रेयसीने जयेशला दिली.
५ एप्रिल रोजी तिने जयशच्या कुटुंबीयांना फोन करून धमकी दिली की, या प्रकरणात आवश्यक तो निर्णय आजच घ्या, अन्यथा जयेशचा हा शेवटचा दिवस आहे. याच कारणावरून जयेशने ५ एप्रिल रोजी दुपारी पाऊणच्या सुमारास तिच्यासमोरच गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप शामकुमार दादलानी यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी रात्री पावणे बाराच्या सुमारास गुन्हा नोंद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.