आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीम:सिव्हिल लाईन येथे मनसे वाहतूक सेनेची शाखा

वाशीम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बळकट करण्यासाठी सिव्हील लाईन येथे ३१ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या हस्ते मनसे वाहतूक सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रम मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, वाहतूक सेनाध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनात वाहतूक सेना उपाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या परिश्रमातून पार पडला. यावेळी डांगे यांनी फित कापून शाखा नामफलकाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला मनसे जिल्हा उपाध्यक्ष केशव गरकळ, मालेगाव तालुकाध्यक्ष गवई, वाशीम तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, रिसोड शहर उपाध्यक्ष अमोल तुरेराव, महिला सेनेच्या सिता धंदरे यांची उपस्थिती होती. यावेळी शाखा अध्यक्ष महादेव जोगदंड, शाखा उपाध्यक्ष तानाजी ढोणे, शाखा सचिव दिनेश हरणे, सदस्य अशोक पंडीत, प्रकाश मडी, सुनिल ढोणे, राजकुमार कांबळे, संतोष पारसकर, विनोद आठवले आदींचा मनसेत प्रवेश करण्यात आला. कार्यक्रमाला गणेश इंगोले, प्रकाश कवडे, गजानन कुटे, विठ्ठल राठोड, मयनोद्दीन काझी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...