आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची मुलगी आणून द्या:कुटुंबाचा आर्त टाहो; पोलिस म्हणतात, तरुणी ताब्यात आल्याशिवाय नेमके सांगता येणार नाही

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीमध्ये राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 19 वर्षे वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली. त्या संदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिस तिचा शोध घेत आहे. तरुणी ताब्यात आल्याशिवाय नेमके प्रकरण काय आहे, ते सांगता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, खासदार नवनीत राणा आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे.

याचवेळी कुटुंबीयांनी सांगितले की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पोलिसांनी आमची मुलगी जिथे कुठे असेल तेथून परत आणून द्यावी, अशी मागणी तरुणीच्या घरच्यांनी पोलिसांना केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

दरम्यान बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा राजापेठ पोलिस स्टेशनला पोहोचल्या, या प्रकरणावरून चर्चा करत असताना त्यांनी राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर आरोप केला की, तुम्ही माझा फोन का रेकॉर्ड केला. या प्रकरणावरून पोलिस ठाण्यात चांगलाच गदारोळ झाला होता.

युवती बेपत्ता झाल्यामुळे खासदार नवनीत राणा व भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे राजापेठ पोलिसांनी तरुणीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तसेच एका संशयित युवकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलवले आहे. मात्र वृत्त लिहिस्तोवर सदर युवतीचा शोध लागला नव्हता. याचवेळी कुटुंबीयांनी सांगितले की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पोलिसांनी आमची मुलगी जिथे कुठे असेल तेथून परत आणून द्यावी.

तरुणीचा शोध सुरू

पोलिस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांनी राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर आरोप केला की, त्यांनी माझा कॉल मुद्दामहून रेकॉर्ड केला आहे. वास्तविकता सध्या सर्व मोबाइलमध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्ड होतात. या प्रकरणात आम्ही तरुणीचा शोध घेण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न करत आहोत. तरुणी ताब्यात आल्याशिवाय नेमके प्रकरण काय आहे, ते सांगता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...