आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सर्वाधिक वर्दळीचा बिच्छन नदीवरील ब्रिटीशकालीन पांढरा पुल शिकस्त झाल्याने अखेर शुक्रवारी (दि. 16) पुर्व नियोजनानुसार तोडण्यात आला. तेथे आता नव्याने पुलाची निर्मिती केल्या जाणार आहे.
परतवाडा-बैतुल मध्यप्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्ता व विविध पुलांचे काम जवळपास 270 कोटींपेक्षा अधिक खर्च करून करण्यात आले. मात्र, पांढऱ्या पुलाचे काम मंजुर होवून सुध्दा गेल्या वर्षभरापासून रेंगाळलेले होते. या पुलावरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चंद्रभागा योजनेची मुख्य जलवाहिनी असल्याने ही जलवाहिनी स्थानांतरीत करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अचलपूर नगर पालिकेला पत्र दिले होते. मात्र या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाल्याने या पुलाचे काम रेंगाळले. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील पांढरा पुल तोडून तेथे नवीन पुलाचे बांधकाम करणे अडचणीचे ठरत होते.
अखेर काही दिवसांपुर्वी नगर पालिकेने जलवाहिनी स्थानांतरीत केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने आज नेमलेल्या एजेंसीच्या माध्यमातून हा पुल तोडून नवीन पुलाच्या निर्मितीचे काम प्रारंभ केले जाणार आहे. या ब्रिटीशकालीन पुलाचे आयुष्य संपले असल्याने कुठल्याही क्षणी तो कोसळू शकतो. त्यामुळे यापुर्वीच पुलाला लागूनच 1997 मध्ये अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरा पुल उभारला. एकाच ठिकाणी लागून असलेल्या दोन पुलांपैकी एका पुलावरून जाणारी, तर दुसऱ्या पुलावरून येणारी वाहतूक वळती केली तेव्हापासुन या पुलावरुन दुहेरी वाहतूकीची व्यवस्था शहरात अस्तित्वात आली.
हा मार्ग 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्गात परिवर्तीत झाला. राष्ट्रीय महामार्गांतर्गत दर्जावाढ करून सिमेंट रस्त्याचे काम पुर्ण केले गेले. त्यातच या पुलाचे बांधकाम प्रस्तावित होते. अखेर गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले पुलाचे काम प्रारंभ करण्यात आले असून बैतुलकडून अंजनगावकडे जाणाऱ्या पुलाचा एक भाग पूर्ण झाल्यानंतर अंजनगावकडून बैतुलकडे जाणाऱ्या दुसरा पुलाचे काम नव्याने केल्या जाणार आहे.
लवकरच पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न
''पुल निर्मितीकरिता नेमलेल्या एजेंसीला नवीन पुलाच्या निर्मितीसाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. त्यापुर्वीच पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.'' -पी. एस. वासनकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.