आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्यात मेळघाटातील अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना अशा ठिकाणी पोहोचणे फार अवघड असते. पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचून उपचार करणे सोयीचे होण्यासाठी फॅब्रिकेटेड पुलांची व सातत्यपूर्ण संपर्क यंत्रणेची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी (दि. १) मेळघाट दौऱ्यादरम्यान अचलपूर येथे आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला आ. राजकुमार पटेल, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारीदिलीप रणमले, चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने आदी उपस्थित होते.
राबवण्यात येतील. माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण संकल्पना राबवल्या जाणार. मृत्युदर शून्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. मेळघाटातील आरोग्य केंद्रातील स्त्रीरोग तज्ज्ञ, बधीरीकरण तज्ज्ञ तसेच डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य केंद्रातील आवश्यक वैद्यकीय उपकरणे, सोयीसुविधा औषधींचासाठा, रुग्णवाहिका पूरक प्रमाणात ठेवण्यात येईल. कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी कुटुंबांचे स्थानिक स्तरावर समिती स्थापन करून समुपदेशन करण्यावर भर दिला जाईल, असे, सावंत म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या श्रेणी उन्नत करण्यात येणार येणार आहे. ५० खाटांची क्षमता असलेल्या आरोग्य केंद्रात दुप्पट खाटांची संख्या वाढवली जाईल. सध्या अस्तित्वात असणाऱ्या रुग्णालयात अधिक मनुष्यबळ व उपकरणे प्राधान्याने देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉक्टर, परिचारिकांची नियमित उपस्थिती हवीच आरोग्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची नियमित उपस्थिती राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीपट सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. आरोग्यसेवा पुरवताना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकीदही त्यांनी यावेळी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.