आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा:सैलानी यात्रेला बंदी तरीही काढला संदल, बेकायदेशीर सैलानी बाबाचा संदल काढल्याप्रकरणी 1011 लोकांवर गुन्हा दाखल

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिंपळगाव सराई गावातून संदल काढल्यामुळे भाविकांची गर्दी झाली त्यामुळे शासनाच्या नियमाचे उल्लंघन झाले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव सैलानी येथील यात्रा होळीला भरते. मात्र गतवर्षी व यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे यात्रा जिल्हाधिकारी यांनी रद्द केली होती. तरीही या यात्रेदरम्यान निघणारा सैलानी बाबाचा संदल प्रशासनाची परवानगी नसतांना बेकायदेशीरपणे काढण्यात आला.

पिंपळगाव सराई गावातून संदल काढल्यामुळे भाविकांची गर्दी झाली त्यामुळे शासनाच्या नियमाचे उल्लंघन झाले. यानंतर बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या फिर्यादीवरून रायपुर पोलीस स्टेशन येथे आरोपी शेख रफिक, शेख करीम, शेख शफीक, शेख करीम, हाजी हाशम, शेख हबीब, शेख नजीर, शेख कासम, शेख चांद, शेख हबीब, शेख कदीर, शेख नईम, शेख असलम, शेख जहीर, शेख राजू, शेख शहजाद यांच्यासह 1000 अज्ञात व्यक्तीवर रायपूर पोलीस स्टेशनला कलम भा.द. वि. 188 269 34 कलम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र को बीड 19 2020 चे नियम 11 तसेच महाराष्ट्र कलम 37 एक 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास बुलढाणा पोलीस अधीक्षक चावरीया रायपूर ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे हे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...