आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या वतीने दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या दरवाढीच्या निषेधार्थ प्रहार युवा तालुका प्रमुख किरण होले यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
बस स्थानक चौकातून प्रारंभ झालेल्या मोर्चात बैलबंडीमध्ये दुचाकी व सिलिंडर ठेवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर, तालुका प्रमुख डॉ. दिनेश म्हाला, शेतकरी उपजिल्हा प्रमुख महेश कुरळकर, विधानसभा प्रमुख प्रदीप चौधरी, किरण होले, सुनील पुरी, सुधीर पावित्रकर, उपतालुका प्रमुख आकाश घटाळे, चेतन बोरेकर, अनुप गावंडे, वैभव कावरे, तेजस गणेशपुरे, आशिष गोळे, हिरालाल इंगळे, सुनील गवई, सुरेश पाचर्डे, वसंत पाटील, लता गावंडे, मेघा कोल्हे, अर्चना भटकर, अर्चना उघडे आदींसह प्रहारचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.