आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडी-दुचाकीचा अपघात:शिराळाजवळ दुचाकीस्वार ठार; पत्नी, मुलगी जखमी, आ. बच्चू कडू मदतीला आले धावून

प्रतिनिधी । चांदूर बाजार4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी मदत करताना आमदार बच्चू कडू. शेजारी इतर नागरिक. - Divya Marathi
अपघातानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी मदत करताना आमदार बच्चू कडू. शेजारी इतर नागरिक.

चांदुर बाजार-अमरावती मार्गावरील शिराळाजवळ एका दुचाकीने बैलगाडीला मारलेल्या धडकेत दुचाकीस्वार उमेश ज्ञानेश्वर टाले (वय ३३) यांचा जागीच मृत्य झाला. तर, जखमी पत्नी व मुलाला उपचारकरिता अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याचवेळी येथून आमदार बच्चू कडू जात होते. त्यांनी हा अपघात पाहताच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.

बैलगाडी अचानक आली रस्त्यावर

नजिकच्या शिरजगाव बंड येथील रहिवासी उमेश टाले हे पत्नी व लहान मुलाला घेऊन एका कौटुंबीक कार्यक्रमासाठी चांदुर बाजार, बोराळामार्गे अमरावतीकडे जात होते. अशातच शिराळाजवळ शेतातून निघालेली बैलगाडी अचानक रस्त्यावर आल्याने त्यांची दुचाकी बैलगाडीवर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की उमेश टाले यांचा जागीच मृत्य झाला. तर, पत्नी व मुलगा जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते उमेश टाले यांच्या डोक्याला जबर इजा झाली होती. दरम्यान जखमी पत्नी व मुलगा यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

बच्चू कडूंची मदत

अपघात झाला त्याचवेळी माजी मंत्री बच्चू कडू या मार्गाने जात होते. हा अपघात दिसताच त्यांनी आपले वाहन थांबवून कार्यकर्त्यांसह मदतकार्य सुरु केले. त्यांनी तत्काळ अपघातातील जखमींना रिम्स हॉस्पिटलला हलविले. उमेश हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या अचानक मृत्यने चांदुर बाजार मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...