आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:महिला न्यायाधीशांच्या घरी चोरी, दागिन्यांसह ऐवज लंपास

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साईनगर परिसरात सदानीनगरमध्ये राहणाऱ्या महिला न्यायाधीशांच्या (प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी) घरात चोरट्यांनी प्रवेश करुन सोन्याचे दागिने व इतर साहित्य लंपास केल्याचे रविवारी (दि. ३) रात्री समोर आले. बडनेरा पोलिसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. १ एप्रिलला दहाच्या सुमारास महिला न्यायाधीश घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. रविवारी (दि. ३) रात्री आठ वाजताच्या सुमारास त्या घरी परत आल्यानंतर त्यांना घराच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता, कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील ९९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच ४५ ग्रॅम चांदी व १५०० रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. चोरी झाल्याची माहिती न्यायाधिशांनी बडनेरा पोलिसांना दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. न्यायाधिशांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद केली आहे. चोरीची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच बडनेरा ठाण्याचे पथक सुध्दा घटनास्थळी पोहोचले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी बडनेरा व गुन्हे शाखेचे पथक प्रयत्न करत आहेत. न्यायाधिशांच्याच घरात चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...