आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:न्यू विजय कॉलनीमध्ये घरफोडी, 1 लाख 81 हजारांचा ऐवज लंपास

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवीन बायपास मार्गांलगत असलेल्या न्यू विजय कॉलनीतील एक कुटूंब महालक्ष्मी देवींच्या कार्यक्रमासाठी अकोला येथे गेले होते. यावेळी बंद घरात प्रवेश करुन चोरट्यांनी घरातील कपाट फोडली. यावेळी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६० हजारांची राेख असा एकूण १ लाख ८१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही चोरी झाल्याचे शनिवारी (दि. ३) समोर आले आहे.

श्याम प्रकाश देव (३३, रा. न्यू विजय कॉलनी, जुना बायपासजवळ, अमरावती) यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे. श्याम देव व त्यांचे कुटुंबीय १ सप्टेंबरला महालक्ष्मी कार्यक्रमासाठी अकोला येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दरम्यान, शनिवारी त्यांना घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच ते अकोल्यावरून घरी आले. घरात जाऊन पाहणी केली असता चोरट्यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये असलेले सोन्याच्या पाच अंगठ्या, एक ठुशी हार व अन्य दागिने असे ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत ९६ हजार रुपये, तसेच २५ हजारांचे चांदीचे दागिने व ६० हजार रुपये रोख असा सुमारे १ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी राजा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच श्याम देव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...