आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसात तक्रार नोंद:तिवसा तालुक्यात दापोरी खुर्द अंगणवाडी केंद्र फोडून शैक्षणिक साहित्याची चोरी

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दापोरी खुर्द येथे अंगणवाडी केंद्र फोडून अज्ञात चोरट्याने २८ हजार ५०० रुपयांच्या शैक्षणिक साहित्याची चोरी केली. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये एलईडी टिव्ही, सोलरवर चालणारो टेबल फॅन यांचा समावेश आहे.

चोरट्याने कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. ही बाब अंगणवाडी सेविका स्वाती रवींद्र राऊत या बुधवारी अंगणवाडी केंद्र उघडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उघडकीस आली. या प्रकरणी त्यांनी तिवसा पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...