आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य करणारे राकाँ नेते अजित पवार यांच्या निषेधार्थ मंगळवार ३ रोजी भाजपद्वारे राजकमल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यादरम्यान जोरदार घोषणाबाजीसह अजीत पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे बेताल वक्तव्य करणारे राकाँ नेते अजित पवार यांच्या विरोधात अमरावती शहर जिल्हा भाजप द्वारे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला.
तसेच निदर्शनेही करण्यात आली. मोठ्या संख्येत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून चौक दणाणून टाकला. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले त्यावेळी काहीवेळ या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अजित पवार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभरात पडसाद उमटत असतानाच अमरावतीतही विरोध, निदर्शने, निषेध होत आहे.
या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे. या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.रवींद्र खांडेकर, जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हा संघटन सरचिटणीस गजानन देशमुख, सरचिटणीस मंगेश खोंडे, दिपक खताडे ,माजी महापौर चेतन गावंडे, उपाध्यक्ष तिश करेसिया, सुनील साहु, राजू राजदेव, रिता मोकलकर, राधा कुरील, गंगा खारकर, नितिन गुडधे, महिला मोर्चा अध्यक्ष लता देशमुख, मंडळ अध्यक्ष राजु मेटे, डाॅ. विरेंद्र ढोबळे, जगदीश कांबे, राजेश किटुकले, राजेश गोयंका तसेच राजु कुरील, प्रवीण वैश्य, शैलेश मेघवाणी, नीलेश काजे, मिलींद बांबल, मनोज काळे, नरेश धमाई, ललित समदुरकर, आशिष अतकरे, रुपेश दुबे, अजिंक्य अनासने, संजय चावके, रश्मी नावंदर, सविता ठाकरे, लविना हर्षे,नुतन भुजाडे, निता राऊत, जयश्री कुबडे, भारती गुहे, भारती गायकवाड, वंदना हरणे, निता राऊत, संगिता तोंडे, वैशाली प्रधान, माया कांबळै, झटालै, चावके तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन राजकमल चौकात शहर भाजपद्वारे करण्यात आले. भाजयुमोने केले ‘आरओबी’वर आंदोलन अजित पवार यांच्या निषेधार्थ सोमवारी भाजयुमो व भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांद्वारे राजापेठ रेल्वे उड्डाण पुलावर आंदोलन केले. यावेळीही अजित पवार यांच्या छायाचित्रांवर जोडे मारण्यात आले होते. कारण या पुलाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे ठेवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.