आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Bus Accident Amravati Pusad Road | Pusad Amravati Bus Accident Near Shinganapur Fork; One Was Killed And At Least 17 Were Injured | Marathi News

बस-ट्रकचा भीषण अपघात:पुसद-अमरावती बसचा शिंगणापूर फाट्याजवळ अपघात; एक जण ठार, तर 24 प्रवासी जखमी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीकडे जात असलेल्या मालवाहू ट्रक व बसचा यवतमाळ-अमरावती मार्गावरील शिंगणापूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. आज दुपारी 12 ते 12.30 वाजेदरम्यान हा अपघात झाला. अपघातात एका वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाला असून, 24 प्रवाशी जखमी झाली आहेत. तर चार ते पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नेर आगाराच्या आगार प्रमुख दिप्ती वड्डे यांनी दिली आहे.

पुसद आगाराची बस क्र.एम.एच. 40 वाय 5926 अमरावतीकडे सकाळी 8.15 वाजता निघाली होती. पुसदवरून दिग्रस दारव्हा नेरमार्गे कर्मचारी प्रेमदास चव्हाण हे घेऊन जात असलेल्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रक क्र. एम.एच. 16 ए.वाय. 9767 यांनी यवतमाळ अमरावती मार्गावरील नांदगाव खांडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाटा येथे जबर धडक दिल्याने दोन्ही वाहनाचा चुराडा झाला असून बस रस्त्यावरून खाली सरकली. तर ट्रक देखील रस्त्याच्या कडेला जाऊन टेकला होता. अपघातात अमरावती जिल्ह्यातील कवठा बुद्रुक येथे राहणारे पांडुरंग खुशाल बोडखे (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 24 प्रवासी जखमी झाले आहेत. यात 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

अनेक जखमी प्रवासी एसटी बसमध्ये अडकून पडल्याचे पाहून तेथील नागरिकांनी मोठ्या कसरतीने बाहेर काढले. व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भीषण अपघातामध्ये रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोबतच अपघात पाहण्यासाठी देखील ये-जा करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

असे आहे 24 जखमींची नावे
प्रशीक शेषराव खडसे (वय 25) राहणार पाथ्रड तालुका नेर

पार्वतीबाई पोहनकर (वय 65) राहणार पिंपरी कलगाव

​​​​​​​मुमताज बेगम (वय 70) राहणार सावणपुरा

अरूणाबाई आमले (वय 65) राहणार पुसद

प्रियंका सतीश दायमा (वय 20)

अश्विन प्रकाश जाधव (वय 20)

सिद्धार्थ राजू धुळे

विजय पांडुरंग पत्रे (वय 20)

सुरेखा इंगळे (वय 45)

साक्षी गजानन उंबरकर (वय 17)

वसंत वाहणे (वय 44)

रोशन शहाकार (वय 38)

अनिकेत नंदू राठोड (वय 19)

कुसुम पोहनकर (वय 69)

वनिता खडसे (वय 50)

पंडित सुदाम कडेल (वय 56)

वनिता आनंद मेश्राम (वय 36)

प्रेमदास चव्हाण (वय 45)

चेतन मुकेश सांगानी

​​​​​​​सारिका भिडेकर

​​​​​​​शालिनी गुजर (वय 42)

बाळकृष्ण केशव काळे

तुषार भिडेकर

​​​​​​​नरेश गुलाब छागाणी (वय 57)

बातम्या आणखी आहेत...