आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसने घेतला पेट:बसचा झाला कोळसा; 35 प्रवाशी सुरक्षित, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतला. या बसमध्ये 35 प्रवाशी होते. सुदैवाने मात्र कोणालाही ईजा झाली नाही. या आगीत बसचा मात्र काही कोळसा झाला. ही घटना नागपूर महामार्गावर अमरावतीपासून 25 किलोमीटर अंतरावरील पिंपळविहीर येथे मंगळवारी (1 नोव्हेंबरला) सांयकाळी 4.00 वाजता घडली आहे.

घटना काय?

नागपूरातील गणेशपेठ आगाराची निमआराम बस (क्रमांक एम. एच. 14 बीटी 4417) अकोल्यावरुन नागपूरकडे प्रवाशी घेवून जात होती. बस अमरावतीवरुन निघाल्यानंतर 25 किलोमीटर पुढे पिंपळविहीर गावाजवळ पोहचताच, इंजिनमध्ये आवाज झाला व धूर निघायला लागला. त्यामुळे बसचालक तुषार अशोक आमझरे यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला लावली आणि काय झालं, हे पाहील. त्यावेळी बोनेटमधून आणखी धूर निघायला लागला. त्यांनी तत्काळ वाहक निलेश वासुदेव वरेटवार यांना सांगितले. त्यामुळे चालक व वाहनांनी बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरलवले आणि बसपासून लांब अंतरावर जाण्यास सांगितले. काही क्षणातच बसने अचानक पेट घेतला.

सुदैवाने बसच्या डिझेल टँकचा स्फोट नाही

बसच्या कॅबिनमधून सुरू झालेली आग पाहता पाहता क्षणार्धात सर्वत्र पसरली. संपूर्ण बस आगीने धगधगत होती. सुदैवाने बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला नाही, अन्यथा यापेक्षाही जास्त नुकसान झाले असते. बसने पेट घेतल्यामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. माहीती मिळताच अमरावतीवरुन अग्नीशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तत्पुर्वी संपुर्ण बस जळून खाक झाली होती. दरम्यान आगीची माहीती मिळाल्यानंतर एसटीचे अमरावती विभागीय व्यवस्थापक निलेश बेलसरे व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. यावेळी बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...