आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारला एसटीची जोरदार धडक:4 प्रवासी जागीच ठार, 6 जण गंभीर जखमी; यवतमाळ- अमरावती मार्गावर भीषण अपघात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न सोहळ्यावरून परतत असलेल्या कार व बसची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये चारजण जागीच ठार झाले. तर, 6 जण गंभीर जखमी झाले.

आज रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास यवतमाळ अमरावती मार्गावर लोणी येथे हा भीषण अपघात घडला.

मृत-जखमींची नावे

रजनी अशोक इंगोले (वय 47), राधेश्याम अशोक इंगोले (27), वैष्णवी संतोष गावंडे ( 22), सारिका प्रमोद चौधरी अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण यवतमाळ तसेच वाशिम जिल्ह्यातील कनेरगाव येथील रहिवासी आहे. याशिवाय अपघातात साक्षी प्रमोद चौधरी ( वय 17), प्रमोद पांडुरंग चौधरी (वय 45), सविता संतोष गावंडे, सचिन नारायण शेंद्रे आणि धनंजय माधव मिटकरे हे जखमी झाले आहेत.

तिघांना नागपूरला हलवले

मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे, चौधरी व इंगोले कुटुंब हे 3 डिसेंबर रोजी लग्न सोहळ्यानिमित्त अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे कारने गेले होते. त्यानंतर आज सकाळी अमरावती येथे देवीचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटीने त्याला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचाराकरिता नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...