आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंजू राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा महामार्ग बोरगाव मंजू गावाबाहेरून गेला आहे. मूर्तिजापूरकडून बोरगावमंजूकडे, बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन ते पळसो दहीगावकडे जाण्यासाठी गत काही दिवसांपासून बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर नव्याने बायपास रोडचे काम सुरू आहे.
मात्र, परिसरात अर्धवट झालेले बांधकाम, रस्त्यावर पसरलेली गिट्टी यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास करावा लागतो आहे. रस्त्याच्या दुरवस्थेतून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या बायपासवर बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या व बोरगाव मंजूकडून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बहुतांश शेतकरी- शेतमजूर दररोज ये-जा करतात. दरम्यान चारचाकी, दुचाकीस्वार यांना आपले वाहन जीव मुठीत धरून महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
शिवाय ऐन रोडवर गिट्टी, मुरुम असल्याने अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटना नियमित होत आहेत. या बायपासवर बोरगाव मंजूकडून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या बायपासचे काम सध्या बंद आहे. बंद कामामुळे जिकडे-तिकडे धुळं पसरली आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान गत महिन्यात बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दितील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी संबंधित विभागाने तसेच संबंधित कंत्राटदाराने लक्ष वेधून त्वरीत रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे, जर या ठिकाणी कुठलाही अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. थांबलेलं काम त्वरित सुरू करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.