आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:वीरशैव समाजातील सीए, ज्येष्ठांचा सत्कार ; स्मृतिचिन्ह देऊन सन्मान

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनहित स्वयं सहाय्यता बचत गट तसेच अमरावती शहर समूहातर्फे वीरशैव कक्कय्या समाजातील गुणवंत तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सीए झालेल्या परतवाडा येथील सचिन सावरकर व मुख्याध्यापक पदी बढती मिळालेल्या नरेश रावळे या दोन तरुणांसह समाजातील ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री गडगडेश्वर, भोले मंदिर येथे आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर होते. तर अतिथी म्हणून वीरशैव समाज संघटनेचे अध्यक्ष राजेश विजयकर, राजीव कुरील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी ज्येष्ठ नागरिक वासुदेवराव कोठेकर, देविदासराव मेशकर, रामभाऊ विजयकर, किसनराव वाटकर, माजी नगरसेवक रघुनाथराव विजयकर आणि रामभाऊ सावरकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन पूर्ती गायकवाड-लाखोडे यांनी केले. वीरशैव समाज संघटनेचे रमेश बोरकर, मनोहर चव्हाण, प्रदीप पिढेकर, विलास विजयकर, प्रवीण सावरकर, नामदेव गणेशकर, बाल्या विजयकर, संजूभाऊ गायकवाड, भारत गणेशकर, संजूभाऊ बाळापुरे, माजी नगरसेवक भारत चव्हाण, रामेश्वर सावरकर, सतीश धुमाळे, रघुनाथ सावरकर, दिनेश विजयकर, महेशराज, गणेशभाऊ मेशकर, साहेबराव चव्हाण आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

कक्कय्या समाजातील पहिला सीए
सचिन गणेशराव सावरकर (परतवाडा) हा तरुण कक्कय्या समाजातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहे. त्याच्या यशामुळे समाजातील इतर तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, आणखी काही मुले त्यादृष्टीने प्रयत्न करू शकतात, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. सचिनने हे यश वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राप्त केले आहे. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...