आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवलेंचा आरोप:विरोधकांनी तरुणांना भडकवल्यामुळेच देशभरात अग्निवीर योजनेबद्दल असंतोष उफाळला

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निवीर ही योजना केंद्र सरकारने सर्व सेनाध्यक्षांशी चर्चा करूनच तयार केली आहे. ती युवकांच्या फायद्याची आहे. परंतु युवकांना विरोधकांनी भडकवल्यामुळे सध्या देशभरात त्या योजनेविरुद्ध असंतोष उफाळून आलेला आहे, असा आरोप सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. अकोला येथील कार्यकर्त्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी त्यांनी रविवारी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला.

आठवले म्हणाले, देशभरातील नागरिक विशेषतः युवकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अग्निवीर योजनेत युवकांच्या भावनांचे प्रतिबिंब असायला पाहिजे, असे माझे मत आहे. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मंत्रिमंडळातील इतर ज्येष्ठ सहकारी या योजनेत योग्य ते लोकाभिमुख बदल करून तिची पुर्नमांडणी करणार आहेत. असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले अग्निवीर ही योजना केंद्र सरकारने सर्व सेनाध्यक्षांशी चर्चा करूनच तयार केली आहे. ती युवकांच्या फायद्याची आहे. परंतु युवकांना विरोधकांनी भडकवल्यामुळे सध्या देशभरात त्या योजनेविरुद्ध असंतोष उफाळून आलेला आहे, असे असले तरी युवकांच्या भावनांचे प्रतिबिंब त्या योजनेत असायला पाहिजे, असे माझे मत आहे. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मंत्रिमंडळातील इतर ज्येष्ठ सहकारी या योजनेत योग्य ते लोकाभिमुख बदल करून तिची पुर्नमांडणी करणार आहेत.

वरवर पाहता या योजनेतून चार वर्षांसाठीचा रोजगार मिळणार असला तरी संबंधितांच्या कायमस्वरुपी रोजगाराची सोय होईल, असे बदल या योजनेत केले जात आहेत. वयोमर्यादा कमी करणे हा त्याचाच एक भाग आहे. देशभरात शिष्यवृत्तीचे वेळेवर वाटप व्हावे आणि शिष्यवृत्ती ही वेळेत विद्यार्थ्यांना मिळावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. त्यांच्या मते शिष्यवृत्ती दरवर्षी आणि दोन टप्प्यात दिली जावी, असा नियम आहे.

त्यानुसार वितरण प्रणालीसाठी योग्य ती शिस्त तयार केली जात आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना काटेकोरपणे अमलात याव्यात आणि मागासवर्गीयांचे सर्व क्षेत्रांतील प्रतिनिधित्व वाढावे यासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला रिपाईचे स्थानिक पदाधिकारी माजी नगरसेवक प्रकाश बनसोड, विजय गणवीर, दिवंगत आमदार अनिल गोंडाणे यांचे कुटुंबीय, समाजकल्याणचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...