आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणीच्या गावात बांधकामासाठी आलेल्या तरुणाची एका तरुणीसोबत ओळख झाली. नंतर त्यांनी मोबाइल क्रमांकांची देवाण घेवाण केली. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर तरुणीला फिरायला जाऊ असे सांगून जंगल भागात नेवून जबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडीत युवतीने दिलेल्या तक्रारीवरुन बडनेरा पोलिसांनी तरुणाविरुद्ध (दि. १) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
अरमान ऊर्फ ऐफाज उर्फ गोलू इबादउल्ला खान (रा. बडनेरा, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिडीतेच्या तक्रारीनुसार, २० जुलै २०२१ ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान अरमानने पिडीतेचे लैंगिक शोषण केल्याचे त्या महाविद्यालयीन तरुणीचा आरोप आहे. तरुणीच्या घरासमोर एका घराचे बांधकाम चालू होते. तेव्हा तेथे मजूर कामाला येत होते. तर तरुणी त्याच ठिकाणाहून पाणी भरण्यासाठी, किराणा आणण्यासाठी जात होती. दरम्यान, त्या कामावर अरमान कामाला आला.
त्याचवेळी या दोघांची ओळख व नंतर मैत्री झाली. दरम्यान २० जुलै २०२१ रोजी त्याने तिला तुला घ्यायला तुझ्या गावात येतो, असा कॉल केला. गावात येऊन तो तिला फिरायला घेऊन गेला. दुपारी अंजनगावबारी जंगलात नेऊन त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. पोलीस ठाण्यात रिपोर्ट देते, असे ती म्हणाली. त्यावर तिला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे ती घाबरली. त्यामुळे पुन्हा धमकी देऊन आरोपीने ३ फेब्रुवारीला बडनेरा येथील त्याच्या मित्राच्या खोलीवर नेत शारीरिक संबंध केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.