आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर वसुली:कर वसुलीसाठी मनपातर्फे शिबिरे

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ताकराच्या वसुलीसाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज, शनिवारी शहराच्या विविध भागांत शिबिरे भरविली. दरम्यान उद्या, रविवार, ११ डिसेंबरला सुद्धा अशीच कृती केली जाणार असून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात नागरिकांकडून कराची रक्कम वसूल केली जाणार आहे.

भाजीबाजार, ताजनगर (पंक्चर दुकानासमोर), साबणपुरा, माळीपुरा (हनुमान मंदिरासमोर), आनंद नगर (तुषार टेलर्ससमोर), वलगाव रोड (असोरिया पेट्रोल पंपासमोर), क्रांती कॉलनी (गजानन मंदिरासमोर), रविनगर (दत्त मटेरियलसमोर) या ठिकाणी ही शिबिरे भरवली जातील. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...