आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ:यूजीसी रेग्युलेशनचे पालन न करता नियुक्त केलेल्या राज्यभरातील कुलगुरूंची नेमणूक रद्द करा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूजीसी रेग्युलेशनचे पालन न करता नियुक्त केलेल्या राज्यभरातील कुलगुरूंची नेमणूक रद्द करा, अशी मागणी करत महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकांनी राज्य शासनाविरुद्ध पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 2013 च्या परीक्षांवरील बहिष्कार काळातील वेतनाबाबत न्यायालयाच्या निर्णयांची अंमलबजावणी, पीएच.डी./ एम.फिलधारक शिक्षकांना प्रोत्साहनपर वेतनवाढ तसेच नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्याही सदर आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम-फुक्टो) त्यासाठी आंदोलनांचे विविध टप्पे जाहीर केले आहे.

आंदोलनाचे विविध टप्पे

1 जून ते 30 जून या कालावधीत त्या-त्या विभागातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देणे, 15 ते 20 जून या कालावधीत शिक्षण सचिव व शिक्षण संचालक यांचा निषेध करणारे ई-मेल संदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सचिव उच्च व तंत्र शिक्षण यांना पाठविणे, 1 ते 15 जुलै या कालावधीत संघटनेच्या विद्यापीठस्तरीय आणि जिल्हास्तरीय अधिवेशनाचे आयोजन करुन त्याद्वारे महासंघाची भूमिका स्पष्ट करणे, असे आंदोलनाचे टप्पे आहेत.

शासन जुमानले नाही तर...

आंदोलनानंतरही शासन जुमानले नाही तर 16 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षक आपआपल्या कार्यस्थळी काळ्या फिती लावून काम करतील. 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व शिक्षक संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्या कार्यालयासमोर धरणे देतील. त्यानंतर 1 ऑगस्टला दुपारी 4 वाजता आपआपल्या विभागातील शिक्षण सहसंचालक कार्यालयावर धरणे आणि 17 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता कुलगुरू यांच्या कार्यालयावर धरणे किंवा मोर्चा आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांदे आणि सचिव डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...