आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू; अमरावतीत 6 ते 10 जून दरम्यान शिबिर भरवणार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठतर्फे कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियानाची सुरूवात ४ फेब्रुवारी रोजी मुंबई प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि सध्या विदर्भ अशा संपूर्ण प्रदेशामध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. १ जूनपासून हे अभियान अमरावती जिल्ह्यात विदर्भ जैन प्रकोष्ठ अध्यक्ष विनोद जांगडा यांच्यातर्फे राबवण्यात येत आहे.

सदर अभियान माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, जन प्रकोष्ट प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या मार्गदर्शनात भाजप शहराध्यक्ष किरण पातुरकर, जैन प्रकोष्टचे शहराध्यक्ष सजल जैन राबवणार आहेत.

अमरावतीमध्ये ६ ते १० कॅम्प मोफत आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचे जैन यांनी सांगितले. या शिबिराअंतर्गत कॅन्सरच्या तपासण्या करणार आहोत. यात विशेष करून गर्भाशय कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, मुख कॅन्सर आणि ब्लड कॅन्सरच्या विविध चाचण्या करण्यात येणार आहे. साधारणतः ह्या सर्व महागड्या टेस्ट आहेत. सदर टेस्ट ८ ते १० हजार रुपये खर्च करुन आपल्याला कराव्या लागतात. परंतु ही निःशुल्क संधी व सेवा आज आपण लोकांच्या घरापर्यंत पोहचवण्याचे कार्य करणार असल्याचे जैन प्रकोष्ठच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ऑल इंडिया जैन मायनॅरिटी फेडरेशन आणि ललित गांधी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून ही कॅन्सर डिटेक्शन बस मिळालेली आहे. या बसमध्ये सर्व प्रकारच्या अद्ययावत मशिनरी लावलेल्या आहेत. प्रत्येक गावात जावून मोफत तपासणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अमरावती शहरात होणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.

कॅन्सरमुळे भारतातील मृत्यू दर वाढलेला आहे. जेवढे रुग्ण मागील दिड-दोन वर्षात कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, त्याच्या दीडपट जास्त म्हणजे ७.५ लाख लोक दरवर्षी कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. त्याला कारणीभूत राहणीमान असेल, आहार असेल किंवा पेस्टीसाईडचा जास्त उपयोग असेल. पण एक मुख्य कारण हेही आहे की, आपण कॅन्सरचे निदान उशीरा करतो. हे निदान जर लवकर झाले तर कॅन्सर आटोक्यात येऊ शकतो. तरी या संधीचा लाभ अमरावती शहरवासीयांनी घ्यावा, असे आवाहन विदर्भ जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष विनोद जांगडा, संघटन सरचिटणीस गजानन देशमुख, सरचिटणीस युवा मोर्चा भाजप अंकित चुंबळे, उपाध्यक्ष जैन प्रकोष्ट राजेंद्र बन्नोरे, उपाध्यक्ष जैन प्रकोष्ट गौरव चोपडा आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...