आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगावपासून काही अंतरावरुन नागपुर-मुंबई समृद्धी महामार्ग जातो. या महामार्गावर आज, बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दहिसर-मुंबईचे दोन व्यक्ती ठार झाले. हा अपघात आज (ता. १२) सायंकाळी घडला.
टाटा सुझुकी कंपनीच्या एएलएक्स कारच्या (एमएच-४७ बीबी-६५७४) समोरच्या चाकाचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.
अतुल तावडे व राजू शिंदे ही अपघातात मृत झालेल्यांची नावे असून हे दोन्ही व्यक्ती ४५ ते ५० वयोगटातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांसह प्रवेश पाटील व बाळकृष्ण धमाले हे दोघे गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकांसह एकूण पाच जण या वाहनात होते.
हे वाहन मुंबईहून नागपुरकडे जात होते. दरम्यान सायंकाळी सात, साडे सातच्या सुमारास समृद्धी महामार्गावर या वाहनाच्या समोरच्या चाकाचा टायर फुटला. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन उलटले.
उलटलेले वाहन बरेच अंतर घासत पुढे गेले. त्यामुळे त्यातील चौघांनाही जबर दुखापत झाली. सुदैवाने एअर बलून उघडला गेल्यामुळे चालक किशोर म्हात्रे बचावला. त्यांना किरकोळ मार लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. समृद्धी महामार्गावर वेग अनियंत्रित असणे, टायर फुटणे, वाहन रस्त्याच्या कडेला धडकणे अशा कारणांमुळे अलिकडच्या काळात अनेक अपघात होत आहेत. पोलिस आणि परिवहन खाते या कारणांचा शोध घेत असून ठिकठिकाणी स्पीड गन बसवल्यानंतरही आणि पोलिस वाहनांचे पेट्रोलिंग वाढविल्यानंतरही अपघाताची मालिका सुरुच आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.