आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गोपनीय माहितीच्या आधारे अवैध हत्यार बाळगल्या; अवैध हत्यारप्रकरणी सुरवाडीत युवकांवर कारवाई

तिवसा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नजीकच्या सुरवाडु येथे अवैधरीत्या हत्यार बाळगल्या प्रकरणी एका२९ वर्षीय युवकांवर तिवसा पोलिसांनी कारवाई केली.राजेंद्र उर्फ लक्ष्मीकांत घोरमाळे असे पोलिसांनी कारवाई केलेल्या युवकाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी कारवाई करून युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी जुनी तलवार जप्त करण्यात आली.ही कारवाई सपोनि संदीप चव्हाण,नापोकॉ अरविंद गावडे , मनापोकॉ सुरेखा ,पोकॉ महेश ,पोहेकॉ गजभिये यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...