आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी‎:आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी‎ देणाऱ्या भावी वरासह आठ जणांविरुद्ध गुन्हा‎

अमरावती‎ ‘2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासाठी मोठा हॉल बुक करा,‎ लग्नासाठी लागणारे कापड‎ सिटीलॅन्डमधून घ्या, ४० तोळे सोने‎ देऊन मुलीचं लग्न करा’, ही आपली‎ मागणी मुलीकडील मंडळींनी मान्य‎ केली नाही म्हणून वराकडील‎ मंडळींनी लग्न मोडले. त्यानंतर भावी‎ वराने भावी वधुला तिचा आक्षेपार्ह‎ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी‎ दिली. त्यामुळे सदर मुलीने दिलेल्या‎ तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी‎ मंगळवारी भावी वरासह आठ‎ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.‎ चंद्रशेखर राजेंद्र तेलगोटे (रा.‎ नागपूर) याच्यासह आठ जणांविरुद्ध‎ गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील‎ एका मुलीसोबत चंद्रशेखर तेलगोटे‎ याचे लग्न जुळले होते.

दरम्यान, ३‎ एप्रिलला चंद्रशेखर व त्याचे‎ नातेवाईक मुलीकडे आले. लग्नाची‎ तारीख निश्चित करण्यासोबतच‎ लग्न शहरातील मोठ्या हॉलमध्ये‎ करा, लग्नाचे कापड‎ सिटीलॅन्डमधूनच घ्या, ४० तोडे सोने‎ घ्या, अशी मागणी त्यांनी भावी‎ वधूच्या कुटूंबियांकडे केली. यावेळी‎ या मागण्या मान्य नसल्याचे‎ भावीवधूच्या आईने त्यांना सांगितले.‎ त्या कारणावरुन त्यांनी लग्न तोडले.‎ तसेच काही दिवसांपूर्वी लग्न‎ जुळल्यानंतर चंद्रशेखर शहरात‎ आला होता.

त्यावेळी तो भावी‎ वधूला घेवून फिरायला गेला होता.‎ या दरम्यान त्याने भावी वधूसोबत‎ असभ्य वर्तन केले होते. त्या‎ प्रकाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ‎ आपल्याकडे असून, तो मी व्हायरल‎ करतो, अशी धमकी त्याने दिल्याचे‎ तक्रारदार भावी वधूने पोलिस‎ तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी‎ गाडगेनगर पोलिसांनी चंद्रशेखर‎ तेलगोटे व अन्य सात जणांविरुध्द‎ हुंडा प्रतिबंधक कायदा, विनयभंग,‎ बदनामी करणे, खंडणी मागणे तसेच‎ धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा‎ दाखल केला आहे.‎