आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:रेल्वे स्टेशन चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्टेशन चौक येथे विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता विभागाद्वारे लोकशाहीर साहित्यरत्न यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बजरंग दल विदर्भ प्रांत सुरक्षा प्रमुख संतोष गहरवाल, विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता विभाग प्रमुख, प्रा. राजीव देशमुख, महानगर अध्यक्ष दिनेश सिह याच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रा. राजीव देशमुख यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला विहीप महानगरमंत्री चेतन वाटनकर, सहमंत्री मयुर जयस्वाल, बजरंग दल महानगर संयोजक त्रिदेव डेंडवाल, यश गुप्ता, सूरज प्रधान, अमित शर्मा, सतीश कुरील, आशिष बोधानी, बंटी चाकर, शिव गायकवाड, उमेश बचले, विकास मारोडकर, अमोल मोखडकर, सनी दूधवाणी, सर्वेश तांबेकर, सोज्वल हिंगणे आदी उपस्थित होते. यानिमित्त शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...