आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव सोहळा:दख्खन मराठा कुणबी समाजातर्फे गौरव सोहळा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जाधव पॅलेस सभागृहात दख्खन कुणबी समाजाचा मेळावा नुकताच पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थी व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कारही या मेळाव्यात करण्यात आला.

आमदार प्रतापराव अडसड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अरुण भाऊ अडसड, महसूल उपायुक्त श्याम कांत मस्के, प्रा. राजेंद्र भांडवलकार, ज्येष्ठ पत्रकार मनोहर परिमल, नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे माजी उपसभापती पुरुषोत्तमराव मोरे, डॉ. प्रवीण कुमार बोडखे, बाबाराव अडसड, निवृत्त उच्चाधिकारी सुधाकर राव काटे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विध्यार्थी तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवाचा ज्येष्ठ नेते अरुण भाऊ अडसड यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य डॉ. अरूण देशमुख, अॅड. मुरलीधर चोपडे, कार्याध्यक्ष प्रवीण परिमल, प्रा. विजय कुंटे, भानुदास शिंदे, बोराडे, मोहन मोरे, सुनील नाईक, डॉ बाबासाहेब शिंदे, निवृत्ती मोरे, उमेश गायकवाड, कमलाकर शिंदे, प्रशांत अडसोड, दीपक परिमल, मनीष दिवटे, आशिष अडसड, पूजा मस्के, सुशीला मोरे, सुनील शिंदे, प्रा. प्रवीण परिमल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सत्कार साेहळा कार्यक्रमाची सांगता सामुहिक राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन अनिता चोपडे यांनी केले. तर आभार डॉ. पंकज मोरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...