आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय रेल्वे बोर्डाच्या कैलास वर्मा, डॉ. राजेंद्र फडके, विभा अवस्थी या तीन सदस्यांनी प्रवासी सुविधा व सेवा समितीच्या माध्यमातून अमरावती शहरातील बडनेरा, नया अमरावती व अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनची पाहणी केली. यावेळी अमरावतीकरांच्या वतीने शहर भाजप व उत्तर भारतीय भाजप मोर्चातील सदस्यांनी मॉडेल रेल्वे स्थानकाला महत्वपूर्ण व मोठ्या स्टेशनचा दर्जा द्यावा, अमरावती ते मुंबई रेल्वे गाडी अंबा एक्सप्रेसबाबत काही सूचना केल्या.
ज्या वेळी गाडी सुरू झाली त्या वेळी गाडीचे कोच नवे होते. पण, काही दिवसानंत सध्या जुने व तुटलेले नळ, प्रसाधनगृहाची स्थिती वाईट आहे. ते बघता तत्काळ नवीन कोच लावावे तसेच अमरावतीहून सुटणारी ही एकमेव रेल्वे आहे. ज्येष्ठ नागरिक,महिलांना त्यात आरक्षण मिळत नाही. या गाडीचे आरक्षणाचा कोटा भुसावळला दिल्याने अमरावतीकर जनतेला आरक्षणा बाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत.
भुसावळ जंक्शन असल्याने मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या आहेत. त्यामुळे अंबा एक्सप्रेसचे ७५ टक्के आरक्षण अमरावती स्टेशनला देण्यात यावे. तसेच मुंबईहून अमरावतीत येणारी गाडी सायंकाळी ७.५० वाजता निघाल्यावर काही अंतर गेल्यानंतर एक तास थांबवून मागील गाड्या पुढे काढण्यात येतात. असे केले जाऊ नये.
त्यामुळे मुंबई स्टेशनवरून शासकीय, निमशासकीय तसेच व्यापारी नागरिकांना सोयीचं होईल. या समस्यांबाबत समितीशी समाधानकारक चर्चा झाली यावेळी भाजप शहर अध्यक्ष किरण पातुरकर, माजी महापौर चेतन गावंडे, माजी मनपा सभागृह नेते तुषार भारतीय, किरण महल्ले, अजय सारसकर,ऋषिकेश देशमुख, भारत महल्ले, मीना पाठक, डॉ. संजय तिरथकर उत्तर भारतीय मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष शैलेन्द्र मिश्रा, गोपाल गुप्ता, डॉ मनिष दूबे, कृष्णदेव तिवारी, मनोज मिश्रा उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.