आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा प्रयोग:मध्य रेल्वेने इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये तयार केले सॅनिटायझर टनेल, तीन सेकंदांमध्ये हाेईल एका व्यक्तीचे निर्जंतुकीकरण

अमरावती3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलेक्ट्रिक लोकोशेडचे सॅनिटायझर टनेल. - Divya Marathi
इलेक्ट्रिक लोकोशेडचे सॅनिटायझर टनेल.
  • दिव्य मराठी विशेष : अवघ्या १५ हजार रुपये खर्चात तयार केला ५०० लिटरची क्षमता असलेला टनेल

प्रेमदास वाडकर

मध्य रेल्वे विभागाने इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये सॅनिटायझर टनेल (बोगदा) तयार केला आहे. मध्य रेल्वेने तयार केलेला बोगदा एका व्यक्तीचे ३ सेकंदांमध्ये पूर्णपणे निर्जंतुकीकरण करू शकताे. मध्य रेल्वेच्या भुसावळ इलेक्ट्रिक लाेको शेडने केवळ १५ हजार रुपयांच्या खर्चातून दोन दिवसांच्या विक्रमी कालावधीत कोरोनाशी लढा देण्यासाठी सॅनिटायझर टनेलचा अाविष्कार केला आहे. 

कोरोना या घातक आजाराने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. कोरोनाची लागण होऊ न देणे हीच या आजारापासून वाचण्यासाठी सर्वात मोठी दक्षता आहे. कोरोनाचा विषाणू हा कपड्यांवर, वस्तूंवर राहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर निर्जंतुकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. विशिष्ट प्रकारच्या रासायनिक मिश्रणाची फवारणी केल्यास कोरोनाला रोखता येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे व्यक्तींपासून वस्तूंपर्यंत सर्वच निर्जंतुकीकरण करण्यावर विशेष भर आहे. मध्य रेल्वेचा इलेक्ट्रिक लोकोशेड विभागदेखील यात मागे नसल्याचे दिसून येत आहे.  विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता आणि वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरएस) भुसावळ हिमांशू रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभाग अभियंता मुकेश चौधरी यांच्या देखरेखीखाली सॅनिटायझर टनेल तयार करण्यात आले अाहे.

१६ तास अखंड काम

सॅनिटायझर टनेलची क्षमता ५०० लिटरची असून १६ तासांपर्यंत अखंडपणे कार्य करतो. दिवसातून एकदाच टनेल पुन्हा भरणे आवश्यक आहे. 

टनेलची अशी आहे रचना

निर्जंतुकीकरण टनेल एमएस पाइप्सद्वारे बनविली आहे. ज्यामध्ये तिरपाल पत्रके असतात. सोल्यूशनची फवारणी करण्यासाठी पीव्हीसी पाइपिंग आणि स्प्रे नोजल दिले आहेत. टनेलचा आकार १५० सेमी बाय १५० सेमी बाय २२० सेमी आहे. टनेलच्या आत व्यक्ती तीन ते पाच सेकंदाच्या कालावधीत फिरत असताना तीन नोजलचा संच फवारला जाईल. पृष्ठभागावर संपर्क साधल्यानंतर, ते विषाणू नष्ट करण्यास पुरेसे कार्यक्षम आहे. कार्यक्षम निर्जंतुकीकरण सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोगद्यात प्रवेश करताना समोर हात वर करण्याचा सल्ला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...