आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:लम्पी त्वचारोग उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाच्या आरोग्य संवर्धनासाठी पर्यावरण व पशुस्वास्थ्य जपणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यानुसार ‘वन हेल्थ’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून संघटित प्रयत्न व्हावेत. लम्पी त्वचारोगाबाबत लसीकरण व उपचार करतानाच भविष्यात अशा साथी पुन्हा उद्भवू नयेत यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व विभागांच्या समन्वयाने कार्यक्रम राबवावा, अशी सूचना केंद्रीय पथकाचे सदस्य व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजयकुमार तेवतिया यांनी बुधवार २३ रोजी जिल्हयातील लम्पी त्वचा रोगाचा आढावा घेताना केली.

पशुंमधील लम्पी त्वचारोग साथीबाबत राबवण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाच्या उपस्थितीत बैठक पशुसंवर्धन कार्यालयात झाली. डॉ. तेवतिया यांच्यासह या पथकात बंगळुरू येथील निवेदी संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. मंजुनाथ रेड्डी, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा समावेश आहे.

सहआयुक्त डॉ. मोहन गोहत्रे, उपायुक्त डॉ. नितीन फुके, उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरूषोत्तम सोळंके, सहायक आयुक्त डॉ. नंदकिशोर अवघड, डॉ. राजीव खेरडे उपस्थित होते. १ हजार ४०३ पशुधन मालकांना नुकसान भरपाई : लंपी आजार प्रतिबंधासाठी ४ लाख ३ हजार ५३६ लसीकरण झाले आहे. मृत जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी १ हजार ६७८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातील १ हजार ५५९ प्रस्ताव मंजूर झाले असून १ हजार ४०३ पशुधन मालकांना नुकसानभरपाई अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मृत जनावरे पुरण्याची ठिकाणे स्वतंत्र असावीत
मृत जनावरांना पुरण्याची किंवा विल्हेवाटीची ठिकाणे स्वतंत्र असली पाहिजेत. त्या परिसरात जलस्त्रोत असता कामा नये, जेणेकरून सुरक्षितता राखली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे कसोशीने पाळावे. म्हशींमध्ये हा आजार खूप आढळत नसला तरीही पुढील साथ टाळण्यासाठी त्यांना आजारी जनावरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. पशुपालकांनी वेगवेगळ्या जनावरांचे दूध काढताना प्रत्येकवेळी हात सॅनिटाईज करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...