आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी नोकरीसाठी सीईटी:खासगी कंपन्यांत नोकऱ्यांसाठी सीईटी, 17 ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी मुदत; उमेदवारांना आपल्यातील कौशल्याच्या आधारे मिळेल नोकरी

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सीईटीद्वारे विविध कॉर्पोरेट्‌सला त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य उमेदवारही मिळणार

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध खासगी कंपन्यांत नोकरी शोधणाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा सर्वांसाठी खुली झाली आहे. यातून संबंधित उमेदवारांना आपल्यातील कौशल्याच्या आधारे नोकरी मिळेल. सोबतच विविध कॉर्पोरेट्‌सला त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य उमेदवारही मिळणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या ‘आयओएन’ विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा (एनक्युटी) आहे. यात सहभागी होणाऱ्या कॉर्पोरेट्‌सना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी समाईक प्रवेश परीक्षा म्हणून वापरता येईल.

दोन वर्षांपर्यंतचा अनुभव असलेले कर्मचारी, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांत शिकत असलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी, माहिती तंत्रज्ञान, बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएसहीमध्ये नोकरीच्या संधींची माहिती आणि तिथपर्यंत पोहोवण्यासाठी सामाईक खिडकी म्हणून ही टेस्ट उपयुक्त ठरते.

येथे करता येईल अर्ज

एनक्‍यूटी प्रत्येक तिमाहीत घेतली जाईल आणि तिचा स्कोअर दोन वर्षांसाठी वैध असेल. पहिली टेस्ट निःशुल्क असून ती २४ ते २६ ऑक्‍टोबरदरम्यान होईल. यासाठी १७ ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी करायची आहे. उमेदवार आपले स्कोअर्स सुधारण्यासाठी अनेक वेळा ही टेस्ट देऊ शकतात. विद्यार्थ्यांना https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifier-test/ येथे अर्ज करता येईल.

बातम्या आणखी आहेत...